Crop Insurance: पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदाच्या (२०२६) खरीप हंगामात मंगळवारपर्यंत (ता. १४) परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांतील ३५ हजार ५४८ शेतकऱ्यांनी पीकविम्याचे ६४ हजार ७२९ अर्ज दाखल केले आहेत. या शेतकऱ्यांनी ४२ हजार २३० हेक्टरवरील पिकांसाठी ४ कोटी ८१ लाख ४५ हजार रुपयांचा विमा हप्ता भरला आहे..यंदाच्या खरीप हंगामात पंतप्रधान पीकविमा योजना परभणी जिल्ह्यातील कपाशी, सोयाबीन, तूर, मूग आणि उडिद या पिकांना लागू आहे. मंगळवारी (ता. १४) सकाळपर्यंत जिल्ह्यातील ५२ मंडलांतील १९ हजार २४९ शेतकऱ्यांनी ३६ हजार १५२ विमा अर्ज दाखल केले होते.या शेतकऱ्यांनी २ कोटी ६४ लाख २९ हजार रुपये विमा हप्ता भरून २३ हजार ८१० हेक्टरवरील पिकांसाठी १४६ कोटी ८९ लाख २५ हजार रुपये एवढ्या रकमेचे विमा संरक्षण घेतले आहे..Pikvima Yojana: खरिपासाठी सुधारित पंतप्रधान पीकविमा योजना लागू.हिंगोली जिल्ह्यातील सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडिद या पिकांचा विमा योजनेत समावेश आहे. मंगळवारी (ता. १४) सकाळपर्यंत जिल्ह्यातील ४० मंडलांतील १६ हजार २९९ शेतकऱ्यांनी २८ हजार ५७७ विमा अर्ज दाखल केले असून १८ हजार ४२० हेक्टरवरील पिकांसाठी स्वहिस्याचा २ कोटी १७ लाख १६ हजार रुपये विमा हप्ता भरुन ११४ कोटी ९ लाख ८६ हजार रुपयाचे विमा संरक्षण घेतले आहे..Dharashiv Pikvima: धाराशिवच्या चार लाख शेतकऱ्यांना ३३६ कोटींचा पीकविमा.सुधारित पीकविमा योजनेनुसार अधिसूचित महसूल मंडळामध्ये चालू वर्षातील सरासरी उत्पादन हे उंबरठा उत्पादनापेक्षा कमी आल्यास शेतकऱ्यांना पीकविमा परतावा देय राहील. सर्व पिकांसाठी जोखीम स्तर ७० टक्के आहे. ७/१२ उतारा, नमुना ८ अ (जमीन धारणाप्रमाणपत्र), पीकपेरा घोषणापत्र, आधार क्रमांक तसेच आधार क्रमांक संलग्न बँक खाते आवश्यक राहील. पीकविमा पोर्टलवर स्वतः ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा आहे..परभणी-हिंगोली जिल्हे विमा अर्ज स्थितीतालुका---- शेतकरी संख्या ---- विमा अर्ज संख्यापरभणी २९७८ ४८४८जिंतूर २४५३ ४२६७सेलू १३०५ २३२२मानवत २५०६ ३६६५पाथरी १४०३ २२०९सोनपेठ १९६७ ३२७९गंगाखेड १९३० ४२४७पालम ४७०२ ११०९१पूर्णा २००५ ३४०५हिंगोली ७९० १४१५कळमनुरी ४८८७ ७५५०वसमत ७३८१ १३३२१ओंढा नागनाथ ३२४१ ६००३सेनगाव १३७० २६२५.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.