Flood Relief: धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची तारेवरची कसरत
Dharashiv Farmers: धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ३ शासन निर्णयांतून ५२२ कोटी ५८ लाख रुपयांची मदत जाहीर झाली आहे. मात्र, मदत वितरणाची गती खूप मंद असल्याने शेतकऱ्यांना दिवाळीच्या सणातही आर्थिक तणावाला सामोरे जावे लागत आहे, अशी तक्रार शेतकरी नेते अनिल जगताप यांनी केली आहे.