Chh. Sambhajinagar News : मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात ४६ हजार ६८८ घराच्या छतांवर संच बसवून वीज निर्मिती सुरू झाली असल्याने मोफत विजेचा लाभ मिळून शून्य विजबिलाचे लाभार्थी झाले आहेत. या लाभार्थी ग्राहकांच्या घराच्या छतावर सौर ऊर्जा पॅनेलच्या माध्यमातून दरमहा १७३.९१ मेगावॉट वीज निर्मिती होत आहे..या योजनेत केंद्र सरकारतर्फे तीन किलोवॅट क्षमतेपर्यंतच्या प्रकल्पांसाठी ग्राहकांना ७८ हजार रुपयांपर्यंत सबसिडी मिळते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारी महिन्यात दरमहा ३०० युनिटपर्यंत मोफत वीज उपलब्ध करुन देण्यासाठी १ कोटी घरांना रूफटॉप सोलर यंत्रणा आस्थापित करण्याचे उद्दिष्ट जाहीर केले आहे. .Pm Surya Ghar Yojana : छत्रपती संभाजीनगरमध्ये ५९ मेगावॉट वीज निर्मितीची क्षमता.त्या अनुषंगाने महाराष्ट्रासाठी २० लाख घरांवर रुफटॉप सोलर यंत्रणा आस्थापित करण्याचे उद्दिष्ट आहे. देशाचा हा प्रकल्प ७५,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीचा आहे. ग्राहकाच्या गरजेपेक्षा अधिक वीज निर्मिती झाल्यामुळे वीजबिल शून्य होते. शिल्लक वीज महावितरण विकत घेते.निवासी घरगुती कुटुंबांसाठी प्रति किलोवॉट ३० हजार रुपये अनुदान २ किलोवॅट पर्यंत मिळते. .३ किलोवॉटपर्यंत अतिरिक्त एक किलोवॉट क्षमतेसाठी १८, हजार रुपये अनुदान मिळते. ३ किलोवॉटपेक्षा मोठ्या सिस्टिमसाठी एकूण अनुदान ७८ हजार रुपयांपर्यंत मर्यादित आहे.या योजनेसाठी सवलतीच्या दरात बँकेकडून कर्ज उपलब्ध होते. ३०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्नही मिळावे. यासाठी ही योजना सुरू केलेली आहे..PM Surya Ghar Yojana: प्रधानमंत्री सूर्यघर वीज योजनेने महाराष्ट्रात गाठला नवा टप्पा; लातूर परिमंडळ आघाडीवर.ग्राहकांसाठी २६ सप्टेंबरला मेळावापंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेत अर्ज केलेल्या व नव्याने अर्ज करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी महावितरण व ऑल इंडिया रिन्युएबल एनर्जी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने २६ सप्टेंबर रोजी सुसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे..मराठवाड्यात सूर्यघर योजनेचे लाभार्थीमंडल कार्यालय लाभार्थीनांदेड मंडल ३,९०५परभणी मंडल ३,९२९हिंगोली मंडल १,७२६नांदेड परिमंडल १०,५६०लातूर मंडल ७,२६४बीड मंडल ३,७०२धाराशिव मंडल १,९४२लातूर परिमंडल १२,९०८छ. संभाजीनगर १३,५७१शहरछ. संभाजीनगर ५,३३९ग्रामीणजालना मंडल ४,३१०छ.संभाजीनगरपरिमंडल २३,२२०छ. संभाजीनगरप्रादेशिक कार्यालय ४६,६८८.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.