Solapur News : जिल्ह्यातील ६०० हून अधिक ग्रामपंचायतीकडे ४५ कोटींचा कर थकीत असल्याचे समोर आले आहे. मागील ५ वर्षात कराची थकबाकी असलेल्या नागरिकास निवडणूक लढवण्यास बंदीचा निर्णय झाल्यास सर्वच गावातील इच्छुकांचा मोठा फटका बसणार आहे. .बार्शी तालुक्यातील ग्रामपंचायतीकडे सर्वाधिक ६ कोटी ८६ रुपयांचा कर थकला असून फक्त १.२० कोटींची वसुली झाली आहे. अक्कलकोट तालुक्यात सर्वाधिक वसुली १.८२ कोटी असून ५ कोटी ७१ लाख रुपये थकीत आहेत..New Gram Panchayat : नकार दर्शविल्याने अडकणार स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा.करमाळा, मंगळवेढा, मोहोळ, पंढरपूर, सांगोला, उत्तर सोलापूर या तालुक्यातील ग्रामपंचायतीची वसुली १ कोटींच्या आत आहे तर माढा, माळशिरस, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर या चार तालुक्यांची वसुली १ कोटींपेक्षा अधिक आहे. .Gram Panchayat Development : ग्रामपंचायतींचा विकास खोळंबला .थकीत कराच्या सरासरी १९.५६ टक्के म्हणजेच फक्त १९ कोटी ५६ लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे. ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी थकीत कराबाबत एकरकमी कर भरणाऱ्या नागरिकांना ५० टक्के करमाफी देण्याचा निर्णय घेण्याचा विचार असल्याचे जाहीर केले आहे. या निर्णयाचा लाभ जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींना होण्याची शक्यता आहे..५० टक्क्यांहून अधिकांना फटका...गेली ५ वर्षे थकीत असलेल्या नागरिकांना निवडणूक लढवण्यावर निर्बंध घातले जाण्याबाबत निर्णय घेण्याचा शासन विचार करत असल्याचे जाहीर वक्तव्य ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केले होते. हा निर्णय होत त्याची अंमलबजावणी झाल्यास प्रत्येक गावातील ५० टक्क्यांहून अधिक इच्छुकांना निवडणूकीत मोठा फटका बसण्याची शक्यता आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.