Solapur News : पुण्याच्या पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय कार्यालयातील रोग अन्वेषण व नियंत्रण विभागाचे सहायक आयुक्त डॉ. भगतसिंग कदम यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शनिवारी (ता. १६) व रविवारी (ता. १७) जिल्ह्यातील विविध ठिकाणी भेटी देऊन लम्पीचा आढावा घेतला. तसेच त्याचे नमुने संकलित केले आहेत..जिल्ह्यात रोज २०० हून अधिक लम्पीबाधित जनावरे आढळत आहेत. त्या पार्श्वभूमीवर रोग अन्वेषण व नियंत्रण विभागाचे सहायक आयुक्त डॉ. कदम, डॉ. प्रदीप रणवरे व डॉ. संजय पवार यांच्या पथकाने जिल्ह्याचा दौरा केला. जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या पंढरपूर, माळशिरस, सांगोला, अक्कलकोट व मंगळवेढा तालुक्यातील काही केंद्रांना भेटी दिल्या. .Lumpy Skin : सिन्नर, निफाड तालुक्यांत ‘लम्पी’चा प्रादुर्भाव .मोबाईल व्हॅनची पाहणी करून काही सूचना दिल्या. त्यांनी तेथे लम्पीबाधित पशूंचे नमुने घेतले. पशुपालकांना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले. पंचायत समित्यांकडील लम्पी प्रतिबंधात्मक लस व अभिलेखांची तपासणी केली. याप्रसंगी जिल्हा उपायुक्त डॉ. विशाल येवले यांच्यासह सहायक आयुक्त, संबंधित तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी उपस्थित होते..उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करापथकाने पंढरपूर, करकंब (ता. पंढरपूर), अकलूज, अक्कलकोट, सांगोला व मंगळवेढा या पशुचिकित्साल यांना भेटी देऊन पाहणी केली. लम्पीसह लाळ खुरकूत रोगाच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करा.तसेच यापुढे जिल्ह्यात संसर्गजन्य रोगांचा पशुधनास प्रादुर्भाव होणार नाही, याची काळजी घ्या, अशा सूचना पथकाने अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या..Lumpy Skin Disease: लम्पीमुळे ४७ जनावरे दगावली; अहिल्यानगरमधे लम्पी रोगाचा उद्रेक .सांगोला जनावर बाजाराचे सर्वेक्षणसहायक आयुक्त डॉ. भगतसिंग कदम यांच्या पथकाने या दौऱ्यात लम्पी रोगनियंत्रणासह लाळ खुरकूत प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या सातव्या फेरीच्या तयारीचा आढावा घेतला..जिल्ह्यातील स्थितीएकूण बाधित पशुधन २,३५७बरे झालेले पशुधन २,०७५दगावलेले पशुधन ६६दररोज सक्रिय पशुधन २१६तालुकानिहाय सक्रिय पशुधनअक्कलकोट १२बार्शी ०१करमाळा १८माढा २६माळशिरस ५३मंगळवेढा २३मोहोळ ०९पंढरपूर ३७सांगोला १६उत्तर सोलापूर ०६दक्षिण सोलापूर १५एकूण २१६.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.