Jalgaon News : सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनस्तरावरून मदत अनुदान मंजूर झाले आहे. यात जिल्हा प्रशासनाला ३ लाख २५ हजार ३५९ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी २९९ कोटी ९४ लाख रुपये निधी प्राप्त झाला आहे. आतापर्यंत यापैकी ५७ टक्के अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर ‘डीबीटी’ द्वारे थेट बँक खात्यात जमा झाले आहे. .शासनाने वेळोवेळी आवाहन करून देखील अद्यापपर्यंत १ लाख ८७ हजार ७०६ शेतकऱ्यांनी ई-केवायसी अपडेट केलेले नाही. त्यामुळे १६७ कोटी ९६ लाख ४३ हजार ९१२ रुपये निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर ‘ई-केवायसी’अभावी डिबीटीअंतर्गत जमा होणे प्रलंबित आहे. सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यात २ लाख ६२ हजार ८९८.४९ हेक्टरसह ३ लाख ३८ हजार १५५ बाधित शेतकऱ्यांचे खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. .यासाठी ३१४ कोटी ६० लाख रुपये नुकसान अनुदानाची मागणी शासनाकडे करण्यात आली होती. यात सप्टेंबरमधील नुकसानीचे अंशतः आणि पूर्णतः बाधित जिल्हे आणि तालुके सुधारित यादी जाहीर केल्यानुसार शासनस्तरावरून नुकसानग्रस्त २ लाख ४७ हजार २६२.०१ हेक्टर क्षेत्रावरील३ लाख २५ हजार ३५९ शेतकऱ्यांसाठी २९९ कोटी २९९ कोटी ९४ लाख रुपये निधी प्राप्त झाला आहे..Farmer Relief : पूर्व विदर्भामध्ये ५६ हजारावर शेतकऱ्यांना मदतनिधीची प्रतीक्षाच .ॲग्रिस्टॅक नसल्यास ई-केवायसी गरजेचीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांना मदत जाहीर केल्यानंतर, मदतीचे दर आणि निकष निश्चित करणारा शासन निर्णय जाहीर झाला. यात अंशतः बाधित आणि पूर्णतः बाधित असे वर्गीकरण करण्यात आले असून ज्या शेतकऱ्यांचे ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी नोंदणी आहे अशा शेतकऱ्यांना ई-केवायसीची सवलत असून सप्टेंबर मधील नुकसानभरपाई मदत मिळणे सुलभ होणार आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांचे फार्मर आयडी-ॲग्रीस्टॅक नसल्यास ई-केवायसी असणे आवश्यक आहे..१३ तालुके बाधितजळगाव जिल्ह्यात १३ तालुके पूर्णतः बाधित असून जिल्ह्यातील ३ लाख २५ हजार ३५९ शेतकऱ्यांच्या २ लाख ४७ हजार २६२.०१ हेक्टर क्षेत्रासह शेतजमीन खरडून गेलेल्या अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांच्या नुकसानीपोटी २९९ कोटी ९४ लाख ४६ हजार ६१८ रुपयांची मदतीची रक्कम बँक खात्यात जमा होणार आहे..Rain Crop Damage : पश्चिम विदर्भात जोरदार पावसाने कापूस, सोयाबीनचे नुकसान.‘डीबीटी’अंतर्गत ३७ कोटींचे वितरणजिल्हा नोंदणीवरून १ लाख ९० हजार २५१ शेतकऱ्यांची माहिती अपलोड झाली असून १७१ कोटी ४८ लाख १४ हजार १४० रुपये निधी मान्यता झाली आहे. त्यात ३९ हजार ६६१ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटी अंतर्गत ३६ कोटी ८७ लाख ३२हजार ६०० रुपये अनुदान निधी वितरीत झाला आहे..पावणेदोन लाख ई-केवायसी प्रलंबितशासनाने मंजूर केलेल्या निधी व शेतकरी मदतीसाठी ई-केवायसी आवश्यक असून आतापर्यंत नुकसानग्रस्त १ लाख ८७ हजार ७०६ शेतकऱ्यांचे ई-केवायसी अपडेट प्रलंबित आहे. त्यामुळे १६७ कोटी ९६ लाख ४३ हजार ९१२ रुपये अनुदान माहिती अभावी प्रलंबित आहे. त्यानुसार १ लाख ३५ हजार १०८ शेतकरी माहिती डिबीटीतंर्गत अपलोड साठी प्रलंबित आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.