Solapur News : पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेंतर्गत जिल्ह्यातील १० हजार १२१ ग्राहकांनी ३४.७० मेगावॉट क्षमतेची सौरछत (सोलर रूफटॉप) यंत्रणा बसविली आहे. नऊ हजार ३५९ ग्राहकांसाठी ७२ कोटी २५ लाखांचे अनुदान मंजूर झाले आहे. त्यापैकी आठ हजार ९१० लाभार्थींना ६८ कोटी ७१ लाखांचे अनुदान देण्यात आले आहे. उर्वरित ४४९ ग्राहकांना लवकर अनुदान वितरित करण्यात येणार असल्याची माहिती महावितरणने दिली. .बारामती परिमंडळातील एकूण १६ हजार ८२९ घरगुती लाभार्थींसाठी १२८ कोटी १० लाखांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. त्यापैकी १६ हजार ८८ ग्राहकांना १२२ कोटी २९ लाखांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. उर्वरित ७४१ ग्राहकांना लवकरच मंजूर अनुदान वितरित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले..PM Surya Ghar Yojana : धुळे जिल्ह्यात नऊ हजार ग्राहक करताहेत छतावर वीजनिर्मिती .७८ हजारांपर्यंत मिळते अनुदानकेंद्र सरकारकडून या योजनेतून सौर प्रकल्पाकरिता एक किलोवॉटसाठी ३० हजार, दोन किलोवॉटसाठी ६० हजार व तीन किलोवॉटसाठी ७८ हजार रुपये अनुदान थेट मिळते. तर गृहनिर्माण संस्था व निवासी कल्याण संघटनांना ५०० किलोवॉटपर्यंत प्रतिकिलोवॉट १८ हजारांचे अनुदान मिळते. या अनुदानाच्या माध्यतून सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ होत असून यातून ग्रामीण भागातील बळिराजाला चालना मिळत आहे..वीज मिळते मोफतघराच्या छतावर सौरप्रकल्प बसवून वीजनिर्मिती करायची व त्याद्वारे घराची विजेची गरज पूर्ण करायची, अशी ही योजना आहे. वापराइतकी सौर वीजनिर्मिती झाल्यास वीजबिल शून्य म्हणजे वीज मोफत मिळते. जादा निर्माण झालेली वीज महावितरणला विकून उत्पन्नही मिळते. .PM Surya Ghar Yojana: प्रधानमंत्री सूर्यघर वीज योजनेने महाराष्ट्रात गाठला नवा टप्पा; लातूर परिमंडळ आघाडीवर.एक किलोवॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पासाठी साधारण १०८ चौरस फूट जागा आवश्यक आहे. यातून दरमहा सरासरी १२० युनिट विजेची निर्मिती होते. मासिक वीजबिलात बचत झाल्याने गुंतविलेल्या रकमेची चार ते पाच वर्षांत परतफेड होते.मंडलनिहाय लाभार्थी व अनुदानसोलापूर ८ हजार ९१० ६८ कोटी ७१ लाखबारामती २ हजार ४४७ १८ कोटी ४७ लाखसातारा ४ हजार ७३१ ३५ कोटी ११ लाख.सेवा पर्व अंतर्गत १७ सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीसाठी विशेष अभियान राबविण्यात आले. या अभियानात विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात आले. या योजनेचा लाभ घेण्यासाठी घरगुती वीज ग्राहकांनी https://pmsuryaghar.gov.in या राष्ट्रीय पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करावी.- सुनील माने, अधीक्षक अभियंता, महावितरण, सोलापूर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.