Parbhani News: रब्बी हंगाम २०२५-२६ मध्ये पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत मंगळवारपर्यंत (ता. २) परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील ५४ हजार ५४८ शेतकऱ्यांनी विविध पिकांचे मिळून १ लाख ४ हजार ७१० विमा अर्ज दाखल केले. .या शेतकऱ्यांनी ६८ हजार ६७० हेक्टरवरील पिकांसाठी २ कोटी ४४ लाख ७२० रुपये विमा हप्ता भरून २५१ कोटी ३४ लाख ५१ हजार रुपये एवढ्या रकमेचे विमा संरक्षण घेतले आहे. रब्बी ज्वारीच्या विमा अर्जाची मुदत रविवारी (ता. ३०) संपली असून गहू (बागायती), हरभरा पीकविमा अर्जासाठी १५ डिसेंबर तर उन्हाळी भुईमुगासाठी ३१ मार्च २०२६ अंतिम मुदत आहे.परभणी व हिंगोली या जिल्ह्यांत ज्वारी, गहू, हरभरा, उन्हाळी भुईमूग या पिकांचा विमा योजनेत समावेश आहे. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी योजना असून ऐच्छिक आहे..Crop Insurance: नांदेडला रब्बीसाठी पीकविमा योजना लागू .कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. पीकविमा अर्ज भरण्यासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक (ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी) असणे अनिवार्य आहे. ७० टक्के जोखीमस्तरनुसार गव्हासाठी हेक्टरी ४५ हजार रुपये विमा संरक्षण असून ३३७ रुपये ५० पैसै विमा हप्ता आहे..Rabi Crop Insurance: पीकविमा घेण्यासाठी १५ डिसेंबरची मुदत.हरभरभऱ्यासाठी हेक्टरी ३६ हजार रुपये विमा संरक्षण असून ३६० रुपये हप्ता आहे. मंगळवारपर्यंत (ता. २) परभणी जिल्ह्यात ४८ हजार १८७ शेतकऱ्यांनी ९३ हजार ८२० अर्ज दाखल केले. या शेतकऱ्यांनी ६० हजार ९२० हेक्टरवरील पिकांसाठी २ कोटी १८ लाख ११ हजार रुपये विमा हप्ता भरून २२२ कोटी ५५ लाख ५१ हजार रुपये एवढ्या रकमेचे विमा संरक्षण घेतले..हिंगोली जिल्ह्यात ६ हजार ३६१ शेतकऱ्यांनी १० हजार ८९० अर्ज दाखल केले. त्यांनी ७ हजार ७५० हेक्टरवरील पिकांसाठी २६ लाख ६१ हजार रुपये विमा हप्ता भरून २८ कोटी ७९ लाख २२ हजार रुपयांचे संरक्षण घेतले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.