रोहन पाटीलकोकण, विदर्भाचा परिसर टेटू झाडाचे मूळ स्थान असले, तरी दोन्ही प्रदेशांत ही झाडे कमी झाली आहेत. कोकण, विदर्भ प्रदेशात ही झाडे सहज वाढतात. मराठवाड्यात केलेल्या एका प्रयोगानुसार तेथे ३ वर्षांत झाडाला शेंगा धरल्या आहेत. यवतमाळ, नांदेड भागातही फळधारणा दिसून येते. तसेच सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातही या झाडाच्या लागवडीस संधी आहे. टेटूच्या झाडाचे अगणित उपयोग आहेत. आयुर्वेद रसशास्त्रातील ‘दशमूलारिष्ठ’ या बहूपयोगी औषधातील महत्त्वाचा घटक म्हणजे टेटू झाडाचे मूळ. यातील वृक्ष रसायनांचा वापर इतर औषधी तयार करण्याकरता केला जातो. सालीतील फ्लावोनाईड्स कर्करोगविरोधी वापरले जाते. पोटाच्या विकारांवर, अस्थमा यावर उपयुक्त आहे. या झाडाच्या शेंगांचे लोणचे फारच रुचकर लागते. झाडाचे सर्व भाग म्हणजे पंचांग विविध औषधांमध्ये वापरले जातात..या झाडाची लागवड दोन पद्धतींनी केली जाते. शेताच्या भोवती/बांधावर लागवड करताना टेटूच्या दोन झाडांमध्ये ७ ते १२ फुटांचे अंतर ठेवावे. कमी क्षेत्राचा विचार करता ७ बाय ७ फूट किंवा १० बाय १० फुटांवर रोपे लावावीत. या लागवडीमध्ये मसाला पीक किंवा इतर प्रकारचे आंतरपीक घेता येते.एका झाडाला सुरुवातीला ७ ते १० शेंगा लागतात. पूर्ण वाढ झालेल्या झाडास पंचवीसहून अधिक शेंगा येतात. सुरुवातीच्या ३ वर्षांत वाढ होताना दर २ फुटांवर ४ वेळा छाटणी घेतली की फांद्यांची संख्या वाढते. झाड जंगली असल्याने कलमी फळझाडांसारखी कमी कालमर्यादा दिसून येत नाही.मुळांची पावडर करण्यासाठी सहा वर्षांनंतरच्या झाडाची मुळे वापरतात. काही झाडे घनलागवड पद्धतीने लावून दशमुलारिष्ठासाठी देता येतील आणि थोडी झाडे शेंगांचे उत्पादन घेण्यासाठी ठेवता येतील. मुळांच्या विक्रीसाठी परत या झाडांमध्ये लागवड करता येईल..Bibba Medicinal Plant: औषधी गुणधर्मांनीयुक्त बिब्बा.जलसंधारणासाठी उपयुक्तटेटू झाड सरळ उंच वाढते. याची मुळे चांगल्या प्रकारे माती धरून ठेवतात. त्यामुळे धूप थांबते. घेर फार कमी असल्याने तसेच उभी वाढ असल्याने सावली पडत नाही.भारतीय वृक्ष असल्याने खते आणि निगा कमी लागतात. वाढ वेगात होते. वानरे झाडाचे नुकसान करत नाहीत.रोप निर्मितीबीपासून उगवण ९५ टक्के क्षमतेने होते. मार्च, एप्रिलमध्ये शेंगा अलगद काढाव्यात. बिया वाऱ्यावर विखुरतात. बियांना पातळ पंख असतात. कोकोपीटमध्ये बिया झाकल्या तरी चार दिवसांत उगवण होऊन महिन्याभरात ८ इंच रोप तयार होते. चांगले वाढलेले रोप शेती बांधावर लावावे..फळ, फूल धारणाटेटूच्या झाडाला रात्री फुले उमलतात. वटवाघळांच्या Eonycteris spelacea आणि इतर एका प्रजातीमार्फत याचे परागीभवन घडते. सुंदर टपोऱ्या फुलांना फणसासारखा उग्र वास असतो. त्यामुळे संख्येने कमी होणारी वटवाघूळ प्रजातीसुद्धा या झाडांच्या लागवडीमुळे जपली जाऊ शकते..Medicinal Plant Subsidy : औषधी व सुगंधी वनस्पती लागवडीसाठी अनुदान सुरू .झाडाचे महत्त्वदशमूलारिष्ठातील टेटूची मुळे प्रमुख घटक आहे. आयुर्वेदिक उत्पादकांकडून मागणी असते. याची लागवड कमी झाल्याने पुरवठा कमी पडतो.कोवळ्या शेंगांचे लोणचे तयार करतात. पोषणमूल्य अधिक असणारे हे लोणचे कुरकुरीत व चविष्ट लागते.कोवळ्या शेंगा उकडून त्याची भाजी किंवा शेवग्याप्रमाणे आमटी बनवली जाते.भारतीय प्रकारातील पानगळीचे झाड असल्याने जमीन सुपीक बनवते.मातीत ओल, वाफसा धरून ठेवते.बियांच्या पावडरीची विक्री होते. स्नायूउद्दीपक, कृमीनाशक, नैराश्यावर बिया आणि सालीची पावडर वापरली जाते.मुळांच्या पावडरीची देखील विक्री होते..शास्त्रीय नाव ः Oroxylum indicumमराठी नाव ः श्योनक टेटू किंवा देवमाडइंग्रजी ः ब्रोकन बोन ट्रीउंची ः २० ते ३० फूटवाढ ः सरळ घेर कमीशेंगांची लांबी ः २ ते ४ फूटएका शेंगेत बियांची संख्या ः २०० ते २५०बी पासून लागवडीनंतर शेंग येण्याचा कालावधी ः ३ ते ४ वर्षेफुलांचा कालावधी ः जून ते ऑगस्टशेंगांचा हंगाम ः सप्टेंबर ते डिसेंबर.प्रक्रियेला संधीटेटूचे लोणचे हा प्रकार भारतीय पारंपरिक खाद्यातला दुर्मीळ प्रकार आहे.टेटूच्या लोणच्यासोबत आळवाचे काप, नेपती, छोटा भोकर, मोठा भोकर फळे आणि खडशिंगी या पाच लोणच्याच्या पारंपरिक प्रकारांची सध्या बाजारात गरज आहे.दशमूलारिष्ठसाठी चांगल्या आयुर्वेदिक कंपन्यांची गरज आहे.मूळ, बियांपासून तयार केलेल्या पावडरीस चांगली मागणी आहे.- रोहन पाटील ७३८७६४१२०१ (लेखक दुर्मीळ वनस्पतींचे अभ्यासक आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.