Soil Fertility : सेंद्रिय शेतीमुळे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते. त्यामुळे सूक्ष्मजीवांची संख्या वाढून मातीची सुपीकता टिकून राहते, उत्पादन खर्चात बचत होते आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत मिळते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले..अति प्रभावित मेगा पाणलोट प्रकल्पांतर्गत नगारवाडी (ता. लोहा) येथील प्रगतिशील शेतकरी विश्वनाथ जायभाये यांच्या एकात्मिक सेंद्रिय शेती प्रकल्पाला जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सोमवारी (ता. २७) भेट दिली..AI In Agriculture: पारंपरिक शेतीला हवी कृत्रिम बुद्धिमत्तेची जोड .यावेळी कंधारचे उपविभागीय अधिकारी विलास नरवट, लोहा तहसीलदार विठ्ठल परळीकर, उपविभागीय जलसंधारण अधिकारी उत्तम गायकवाड, लोहा तालुका कृषी अधिकारी प्रशांत कासराळे, उपकृषी अधिकारी अनिल वडजे, अति प्रभावित मेगा पाणलोट प्रकल्पाचे प्रादेशिक समन्वयक दिनेश खडसे, पाणी फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक प्रविण काटेवाड, सहाय्यक कृषी अधिकारी वैष्णवी चरपे, वॉटरशेड ऑर्गनायझेशनचे गजानन हिवाळे, विजय खंदारे, निलेश महाजन, उमेश वैद्य, आमेर शेख, रुस्तुम थोरवट, अवधूत जाधव, प्रसाद बगाडे तसेच अश्वमेध संस्थेचे सतीश चव्हाण, दुर्गेश कलोडे, नारायण पाटील आणि सुरज राजूरकर उपस्थित होते. .AI In Agriculture: ‘एआय’च्या मदतीने शेती उत्पादन वाढवा : शिरीष देसाई.जिल्हाधिकाऱ्यांनी शेतातील विविध उपक्रमांची पाहणी करताना कृषी विभागामार्फत भाऊसाहेब फुंडकर योजनेअंतर्गत करण्यात आलेली आंबा फळबाग, मनरेगाअंतर्गत उभारलेली सिंचन विहीर, तसेच हाय इम्पॅक्ट मेगा वॉटरशेड प्रकल्पांतर्गत उभारलेल्या गांडूळखत युनिटची पाहणी केली. .विश्वनाथ जायभाये यांनी एकात्मिक शेती पद्धतीत शेवगा, आंबा, जांभूळ, पेरू, चिंच, बोर, चिकू, आवळा, लिंबू, पपई, नारळ फळपिकांसह काकडी, वांगी, टोमॅटो, मिरची आदी भाजीपाला पिकांची सेंद्रिय पद्धतीने लागवड केली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.