Akola News : ‘‘सेंद्रिय पद्धतीने उत्पादित अन्नधान्य, फळे व भाजीपाल्याला सध्या देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये मोठी मागणी आहे. अशा उत्पादनांचे प्रमाणीकरण (Certification) हे अत्यंत महत्त्वाचे ठरत असून, हे क्षेत्र कृषी पदवीधरांसाठी रोजगार निर्मितीचे एक उत्कृष्ट सेवाक्षेत्र म्हणून पुढे येत आहे,’’ असे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले..डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आयोजित सेंद्रिय व्यवस्थापन व प्रमाणीकरण पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या दुसऱ्या बॅचच्या प्रमाणपत्र वितरण सोहळ्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होते..Organic Certification : राज्याची लवकरच सेंद्रिय प्रमाणीकरण यंत्रणा.या प्रसंगी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. श्यामसुंदर माने, कृषी अधिष्ठाता डॉ. देवानंद पंचभाई, शिक्षण विस्तार संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे, इकोसर्टचे (इंडिया) व्यवस्थापकीय संचालक अनिल जाधव, वरिष्ठ व्यवस्थापक मुकेश अपचंदा, कॉटन कनेक्टचे वरिष्ठ व्यवस्थापक हेमंतकुमार ठाकरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे, आत्मा प्रकल्प संचालक तथा डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनचे डॉ. मुरली इंगळे, कृषी विद्या विभागाच्या प्रमुख तथा अभ्यासक्रमाच्या संचालक डॉ. अनिता चोरे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती..हा अभ्यासक्रम पंदेकृवि, इकोसर्ट (फ्रान्स) आणि कॉटन कनेक्ट (साउथ एशिया) यांच्या संयुक्त विद्यमाने २०२२ पासून सुरू झाला आहे. सेंद्रिय शेती, प्रमाणीकरण प्रक्रिया, गुणवत्ता नियंत्रण यांसारख्या बाबींचे शास्त्रीय प्रशिक्षण यात दिले जाते. डॉ. गडाख यांनी सांगितले, की शेतकऱ्यांनी उत्पादित केलेली उत्पादने मानांकनाच्या दृष्टीने दर्जेदार आहेत की नाही, हे निश्चित करण्यासाठी प्रमाणीकरण अनिवार्य आहे. मात्र देशात कुशल प्रमाणीकरण कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता आहे..Organic Certification : शेतकऱ्यांना जगाच्या बाजारपेठेची दारे झाली उघडी .इकोसर्टचे श्री. जाधव यांनी सांगितले, की देशपातळीवर सेंद्रिय प्रमाणीकरणासाठी सुमारे ६५ हजार कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. या गरजेनुसार विद्यापीठाने इकोसर्ट व कॉटन कनेक्टसह अभ्यासक्रम सुरू करून मोठे योगदान दिले आहे. हेमंतकुमार ठाकरे यांनी सांगितले, की जागतिक बाजारपेठेत भारतीय सेंद्रिय कापसाला मोठी मागणी आहे..सेंद्रिय व्यवस्थापन व प्रमाणीकरण हा अभ्यासक्रम निर्यातक्षम उत्पादनासाठी मैलबिंदू ठरणार आहे. विद्यार्थ्यांमधून प्रवीण वानखडे आणि आशिष मुडावतकर यांनी आपले मनोगत व्यक्त करत अभ्यासक्रमामुळे मिळालेल्या ज्ञानाबद्दल समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अनिता चोरे यांनी केले. सूत्रसंचालन अभ्यासक्रमाचे सहसंचालक डॉ. नितीन कोंडे आणि आभार जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी मानले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.