Yavatmal News: रासायनिक शेतीमुळे वाढत चाललेल्या आरोग्यविषयक समस्यांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना विषमुक्त आणि पोषणमूल्यांनी समृद्ध अन्नधान्य मिळावे, तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने पुसद येथे एक महत्त्वपूर्ण आणि अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या अंतर्गत खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून अशा शेतीमालाची विक्री केली जाणार आहे. .उपविभागीय महसूल अधिकारी आशिष बिजवल यांच्या पुढाकारातून महसूल, कृषी व संलग्न विभागांच्या प्रमुखांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत पुसद येथील खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून सेंद्रिय व नैसर्गिक पद्धतीने उत्पादित शेतीमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची संकल्पना मांडण्यात आली..Organic Agriculture Produce : सेंद्रिय उत्पादनाचे प्रमाणीकरण आणि बाजारपेठ ; शेतकऱ्यांसाठी विशेष कार्यशाळा.या बैठकीला तालुका कृषी अधिकारी विजय मुकाडे, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष धनंजय डुब्बेवार, सचिव सचिन हरीमकर, ‘आत्मा’चे संतोष मोरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या वेळी आशिष बिजवल यांनी सेंद्रिय आणि रसायनमुक्त शेतीला बाजाराशी थेट जोडण्याची गरज अधोरेखित करत, शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीची व्यवस्था उभी करण्यावर भर दिला. खरेदी-विक्री संघाने या उपक्रमाला तत्काळ प्रतिसाद देत सेंद्रिय शेतीमाल विक्रीसाठी मंच उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली. .Farmer Producer Organizations: शेतकरी उत्पादक संस्थांसाठी एक नवीन दृष्टिकोन.त्यानंतर सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी घाण्याचे तेल, सेंद्रिय तीळ यांसारखी उत्पादने थेट विक्रीसाठी आणून या उपक्रमाची सुरुवात केली. सेंद्रिय शेतीमालाचे फायदे सांगताना बिजवल यांनी स्पष्ट केले, की रसायनमुक्त अन्नधान्यामुळे आरोग्य सुरक्षित राहते, पोषणमूल्य अधिक मिळते, रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि चवीतही नैसर्गिक फरक जाणवतो. त्यामुळे ग्राहकांना दर्जेदार अन्न मिळते आणि शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य दर प्राप्त होतो. या उपक्रमामुळे स्थानिक सेंद्रिय शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार असून मूल्यवर्धित शेती उत्पादनांना चालना मिळेल. परिणामी अधिकाधिक शेतकरी सेंद्रिय व नैसर्गिक शेतीकडे वळतील..खरेदी-विक्री संघाचे सचिव सचिन हरीमकर यांनी सांगितले, की सध्या हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी संघ पूर्णपणे सज्ज असून, सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल विक्रीस आणावा. ‘‘सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे. शेतकऱ्यांना त्यासाठी योग्य प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सेंद्रिय डाळी, गहू, ज्वारी, हळद, तीळ आणि घाण्याचे तेल शेतकऱ्यांनी विक्रीस आणावे. येत्या काळात तूर व हरभरा कापणीनंतर मोठ्या प्रमाणावर तूरडाळ, चणाडाळ आणि गहूही विक्रीस उपलब्ध होतील,’’ असे श्री. बिजवल यांनी ‘ॲग्रोवन’शी बोलताना स्पष्ट केले. पुसद कृषी उपविभागातील पुसद, महागाव, दिग्रस व उमरखेड तालुक्यातील सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी आवाहन केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.