Land Revenue Code: कलम १५५ चा गैरवापर रोखण्याचे आदेश
Section 155 Misuse: महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ मधील कलम १५५ हे केवळ महसुली अभिलेखातील टंकलेखन प्रमाद किंवा अनवधानाने झालेल्या लेखन प्रमाद दुरुस्तीसाठीच वापरण्याचा स्पष्ट उद्देश असताना, या कलमाचा गैरवापर करून मालकी हक्क, कब्जा, क्षेत्र, धारणाप्रकार व इतर हक्कांमध्ये बदल केले जात असल्याचे गंभीर प्रकार निदर्शनास आले आहेत.