Akola News: अकोला जिल्ह्यात फळबाग लागवडीचे क्षेत्र झपाट्याने वाढत असून, शेतकऱ्यांचा व्यावसायिक फळपिकांकडे कल वाढताना दिसत आहे. पारंपरिक पिकांच्या तुलनेत फळबागांतून मिळणारे अधिक उत्पन्न आणि उपलब्ध शासकीय योजनांना शेतकऱ्यांची पसंती या कारणांमुळे हे क्षेत्र लक्षणीयरित्या वाढले आहे.विशेषतः महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) आणि भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरत असून, २०२५-२६ या वर्षात जिल्ह्यात फळबाग क्षेत्रात मोठी वाढ नोंदविली गेली आहे..मनरेगाअंतर्गत वाढलेली लागवडमनरेगाअंतर्गत अकोला जिल्ह्यास चालू वर्षासाठी १२०० हेक्टरचे लक्ष्य देण्यात आले होते. या लक्ष्याच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून ११८७.८१ हेक्टर क्षेत्राकरिता १३०९ शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी ११५७ लाभार्थ्यांना १०८६ हेक्टर क्षेत्रासाठी तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. मंजूर क्षेत्रावर नोव्हेंबर अखेरपर्यंत ६०९.२२ हेक्टरवर प्रत्यक्ष फळबाग लागवड झाली आहे. .Modern Fruit Farming: शेतीतच भविष्य शोधलेला‘बायोकेमिस्ट्री’चा तरुण.या लागवडीत सर्वाधिक वर्चस्व केळीचे दिसून आले आहे. जिल्ह्यात ४१२.६० हेक्टरवर केळीची लागवड झाली असून हा सर्वांत मोठा हिस्सा आहे. त्यानंतर कागदी लिंबू ६२.३५ हेक्टर, संत्रा ४४.९० हेक्टर, आंबा ३०.९३ हेक्टर, सीताफळ २१ हेक्टर, बांबू २८.१४ हेक्टर, पेरू ५.४० हेक्टर, मोसंबी १.७० हेक्टर, शेवगा १.४० हेक्टर आणि गुलाब ०.८० हेक्टर अशी विविध फळपिकांची लागवड पूर्ण झाली आहे. यावरून शेतकऱ्यांचा कल विविधता राखून व्यावसायिक फळपिकांचे उत्पादन वाढविण्याकडे असल्याचे स्पष्ट होत आहे.Dragon Fruit Farming : ड्रॅगन फ्रूट, अॅव्होकॅडो, मसाला पिकांना ‘एकात्मिक फलोत्पादन’ मधून अनुदान.भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेंतर्गत प्रगतीमनरेगासोबतच भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनादेखील जिल्ह्यात प्रभावीपणे राबवली जात आहे. या योजनेसाठी २०२५-२६ साली जिल्ह्याला २१०.७४ लाख रुपये आर्थिक लक्ष्यांक मिळाला आहे. या योजनेअंतर्गत महाडीबीटी पोर्टलवर १६७६ अर्जांची निवड झाली आहे. यापैकी आवश्यक कागदपत्रे अपलोड केलेल्या ८६३ शेतकऱ्यांचे प्रस्ताव तपासून ४६२ शेतकऱ्यांना ३१६ हेक्टर क्षेत्रासाठी पूर्वसंमती देण्यात आली आहे. पूर्वसंमतीनुसार नोव्हेंबरअखेरपर्यंत ४२ हेक्टर क्षेत्रांवर प्रत्यक्ष फळबाग लागवड पूर्ण झाली आहे. संत्रा २२ हेक्टर, कागदी लिंबू ९ हेक्टर, आंबा ७ हेक्टर आणि पेरू ४ हेक्टर अशी प्रमुख फळपिकांची लागवड करण्यात आली असल्याचे कृषी विभागाने सांगितले.योजना फलदायीदोन्ही योजनांचा परिणाम म्हणून जिल्ह्यात फळबाग क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढत असून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्याच्या दिशेने सकारात्मक बदल दिसत आहेत. फळबाग लागवडीमुळे दीर्घकालीन उत्पन्नाची हमी मिळत असल्याने, तसेच शासनाकडून लागवडीसाठी आर्थिक व तांत्रिक मदत उपलब्ध असल्याने शेतकरी फळपिकांकडे वळत आहेत. येत्या काळात जिल्ह्यात फळ उत्पादन आणि कृषी आर्थिक विकासात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे..शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी फळपिके ही निश्चितच फायदेशीर मानली जातात. त्यामुळे सिंचनाची सुविधा असलेले शेतकरी आता पारंपरिक पिकांसोबतच फळबागांकडे आकृष्ट होत आहेत. त्यांना शासनाच्या योजनांद्वारे पाठबळ देण्याचेही काम होत आहे. शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी स्थानिक कृषी विभागाशी संपर्क साधला तर त्यांना योजनांबाबत सविस्तर माहितीसुद्धा मिळेल.-शंकर किरवे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अकोला.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.