Citrus Farming: विदर्भाचा ‘कॅलिफोर्निया’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वरुड परिसरातील संत्रा, मोसंबी व अन्य लिंबूवर्गीय कलमांच्या विक्रीला यंदा अनियमित पावसाचा फटका बसला आहे. पावसाच्या सुरुवातीच्या टप्प्यात कलमांना चांगली मागणी होती. मात्र, सध्या मागणी अचानक घटल्याने नर्सरीत विक्रीसाठी तयार असलेली लाखो कलमे अडकून पडली असून, नर्सरीधारकांसह या व्यवसायावर अवलंबून असलेल्या पूरक व्यावसायिकांची चिंता वाढली आहे..वरुड तालुक्यातील शेंदूरजनाघाट, टेंभूरखेडा, तिवसा, रवाळा आदी भागांमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणावर संत्रा, मोसंबी आणि लिंबूवर्गीय कलमांचे उत्पादन घेतले जाते. मोर्शी उपविभागात २४२ परवानाधारक नर्सरी असून, त्यापैकी २१८ नर्सरी एकट्या वरुड तालुक्यात आहेत. कृषी विभागाच्या नोंदीनुसार या भागात ७१.५८ लाख संत्रा कलमांचे उत्पादन होत असून, प्रत्यक्षात दरवर्षी एक ते दीड कोटींपेक्षा अधिक कलमे तयार केली जातात..Keli Kand Magani: खानदेशात केळी कंदांखाली क्षेत्र अधिक.पावसाच्या पुनरागमनानंतर काही दिवस संत्रा कलमांना ४० ते ५० रुपये, तर मोसंबी कलमांना ५० ते ६५ रुपये प्रतिकलम दर मिळत होता. त्यामुळे बाजारात चांगली उलाढाल झाली. मात्र, त्यानंतर पुन्हा पावसाचा खंड पडल्याने शेतकऱ्यांनी नवीन लागवडीचे नियोजन पुढे ढकलले. परिणामी कलमांची मागणी कमी झाली असून, नर्सरीधारकांची गुंतवणूक अडकली आहे. संत्रा कलम उद्योगामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होतो..कलमे तयार करणारे कामगार, डोळे चढविणारे कारागीर, सुताच्या गोण्या व दोऱ्या विक्रेते तसेच वाहतूक व्यवसाय या उद्योगावर अवलंबून आहेत. त्यामुळे विक्री मंदावल्याचा परिणाम संपूर्ण ग्रामीण अर्थचक्रावर होत असल्याचे चित्र आहे. एका संत्रा किंवा मोसंबी कलमाच्या निर्मितीसाठी ३० ते ३५ रुपये खर्च येतो. यामध्ये रोपासाठी सुमारे १५ रुपये, तर डोळा चढविणे व मशागतीसाठी सुमारे २० रुपये खर्च होतो..Pomegranate Farming Success Story: पाटेठाण पंचक्रोशीत डाळिंबाची क्रांती.यंदा परराज्यातही पावसाअभावी मागणी कमी झाली असून, शासकीय फलोत्पादन योजनेअंतर्गत परमीट प्रक्रियेलाही विलंब होत असल्याने खासगी विक्रीवरच नर्सरी धारकांना अवलंबून राहावे लागत आहे. वरुड परिसरातील संत्रा व मोसंबी कलमे मध्य प्रदेश, राजस्थान, आंध्र प्रदेश तसेच पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर पाठविली जातात..पावसाअभावी परप्रांतातील संत्रा उत्पादकांनी देखील कलम खरेदीकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे नर्सरीधारक आर्थिक संकटात सापडले आहेत. शासनाने तातडीने परमीट देण्याची प्रक्रिया सुरू करावी.विलास टाकरखेडे, शेतकरी.संत्रा कलमांना सध्या उठाव नाही. एल निनोच्या प्रभावामुळे पावसाबाबत अनिश्चितता आहे. शासन विविध योजना राबवत असले, तरी कलम उत्पादकांनाही विशेष दिलासा मिळणे आवश्यक आहे.गोपाल मलपे, वरुड.वरुड भागात शास्त्रोक्त पद्धतीने दर्जेदार संत्रा-मोसंबी कलमे तयार केली जातात. या नर्सरीधारकांना शासनाने अनुदान देण्याची गरज आहे.डॉ. प्रफुल्ल होले, वरुड.सध्या राजस्थान आणि मध्य प्रदेशातून मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे अपेक्षेइतके मोठे नुकसान होणार नाही, अशी आशा आहे.जावेद खान, संचालक, जेके नर्सरी, वरुड.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.