Vardha News: संत्रा पिकाचा मृग बहार गळाल्यानंतर शासन यंत्रणेकडून पंचनामे झाले, शासनदरबारी मदतीसाठीच्या रकमेचा प्रस्तावही गेला. मात्र, अद्याप संत्रा, मोसंबी उत्पादकांना मदत मिळालेली नाही. त्यामुळे कारंजा घाडगे तालुक्यातील पाच हजारांवर संत्रा बागायतदारांची भरपाईची प्रतीक्षा कायम आहे..मे महिन्यात जास्त पाऊस पडल्याने संत्रा व मोसंबी झाडांना मृग बहार फुटला. यंदा झालेल्या समाधानकारक पावसामुळे बागायतदारांच्या अशा पल्लवी झाल्या होत्या. त्यामुळेच त्यांनी बागेच्या व्यवस्थापनावर भर दिला. शिफारशीत खतांचा डोस देणे यांसह बहार टिकावा याकरिता फवारणीवर मोठा खर्च केला. परंतु त्यानंतर पावसाने खंड दिल्याने आणि तापमान वाढल्याने मृग बहार गळाला..Orange Farmer Guide: ‘संत्रा : स्पेन, इस्राईल व्हाया विदर्भ’ पुस्तक मार्गदर्शक.त्यामुळे संत्रा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले. सरकारने विशेष नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनातून शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी शेतकरी संघर्ष समितीने शासन व स्थानिक आमदार, खासदार यांच्याकडे केली. लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन महसूल विभाग व कृषी विभागाला पंचनामे करण्याचे निर्देश दिले. संबंधित विभागाने शेतकऱ्यांच्या बांधावर जात पंचनामे केले..त्यानंतर तहसील कार्यालयाने कारंजा घाडगे तालुक्यातील ५,१४९ संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा अहवाल दिला. अहवालानुसार ३ हजार एक हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याने त्यानुसार निधी मागणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला. त्या आधारे बाधित संत्रा उत्पादक शेतकऱ्यांकरिता ६ कोटी ७५ लाख ४३ हजार ६५० रुपये मागणी करण्यात आली..Orange Farmer Issue: वरुडबाजार समितीच्या संमतीने होतेय संत्रा बागायतदारांची लूट .निधी मागणीचा प्रस्ताव शासनाकडे जाऊन बराच कालावधी झाला असताना अद्यापही कारंजा तालुक्यातील शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. सर्वेक्षण व पंचनाम्याचे श्रेय घेणाऱ्या लोकप्रतिनिधींनी आता निधीसाठी पाठपुरावा करावा अशी मागणी जोर धरत आहे..मृग बहर गळतीमुळे बाधित क्षेत्र ३००१ हेक्टरतालुक्यातील संत्रा बाधित शेतकरी ः ५,१४९शासनाकडे मागणी केलेली प्रस्तावित रक्कम ः ६,७५,४३,६५० रुपयेमर्यादा २ हेक्टरपर्यंतप्रस्तावित रक्कम प्रति हेक्टर २२,५०० रुपये.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.