Maharashtra Agriculture : अमरावती आंबिया बहाराचा ट्रिगर कालावधी संपून चार महिने उलटले, तरी २०२५-२६चा मंजूर संत्रा फळपीक विमा परतावा अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही. सलग दोन वर्षे परताव्याला विलंब झाल्याने संत्रा उत्पादकांमध्ये नाराजी आहे. पुढील हंगामासाठी विमा काढण्यापूर्वी प्रलंबित परतावा मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे..अमरावती जिल्ह्यातील ४,८२२ संत्रा उत्पादकांनी ४,८४५ हेक्टर क्षेत्रासाठी सुमारे ४ कोटी ११ लाख रुपये शेतकरी हिस्सा भरून २०२५-२६चा विमा काढला आहे. शिरसगाव कसबा महसूल मंडळातील शेकडो शेतकऱ्यांचाही यात समावेश आहे. नोव्हेंबरमध्ये विमा काढल्यानंतर १ डिसेंबर ते ३१ मे हा ट्रिगर कालावधी होता. या कालावधीसाठी नैसर्गिक नुकसान भरपाईकरिता प्रतिहेक्टरी ८,५०० रुपये, तर गारपीट विम्यासाठी २,८०५ रुपये, असा एकूण ११,३०५ रुपये विमा हप्ता शेतकऱ्यांनी भरला..Sericulture Farmers Success Story: रेशीम शेतीतून जगण्याचा आधार शोधलेले कोरडवाहू केकत जळगाव .यापूर्वीही विमा परताव्याला विलंब झाला आहे. २०२३-२४चा परतावा जानेवारी २०२५मध्ये, तर २०२४-२५चा परतावा नोव्हेंबरमध्ये जमा झाला. .यंदा आंबिया बहाराचे उत्पादन कमी असताना विमा परताव्याची प्रतीक्षा करावी लागत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी वाढली आहे. .Onion Farming: पातूर तालुक्यातील शेतकऱ्यांना कांदा चाळींची मिळाली साथ.ट्रिगर कालावधी संपून चार महिने झाले आहेत. दरवर्षी परताव्यासाठी शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागते. राज्य स्तरावरून यासाठी निश्चित वेळापत्रक आणि नियोजन होणे गरजेचे आहे.-अक्षय गुर्जर, संत्रा उत्पादक, शिरसगाव कसबा.विमा परताव्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. येत्या आठ ते दहा दिवसांत विमाधारक शेतकऱ्यांच्या खात्यावर परतावा जमा होईल.- राहुल सातपुते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अमरावती.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.