Citrus Farming Issues: वाढत्या तापमानाचा संत्रा व मोसंबी फळबागांना मोठा फटका बसत असून, फळगळतीत लक्षणीय वाढ झाली आहे. दिवसाचे तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने बागायतदारांचे नुकसान वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. परिणामी यंदा उत्पादनात ६० ते ७० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे..राजुरा बाजार परिसरात हजारो रुपयांचा खर्च करून उभ्या केलेल्या संत्रा-मोसंबी बागांमध्ये सध्या फळगळतीचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. जानेवारी-फेब्रुवारीमध्ये झाडांवर चांगली फळधारणा दिसून येत असताना मार्च महिन्यात तापमानात अचानक वाढ झाल्याने झाडांवरील फळे दिवसेंदिवस गळू लागली आहेत. परिणामी, बागायतदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत..Pune Fruit Market: उन्हाळी हंगामात फळे तेजीत.कृषी विभागाच्या माहितीनुसार, फळबागांसाठी ३५ अंश सेल्सिअसपर्यंतचे तापमान अनुकूल मानले जाते. मात्र सध्या विदर्भात तापमान ४० अंशांच्या पुढे गेल्याने झाडांवर ताण निर्माण होऊन फळगळती वाढली आहे. याचा थेट परिणाम उत्पादनावर होत असून, बाजारात आवक घटण्याची शक्यता आहे. याच मुद्द्यावर भाष्य करताना प्राचार्य शामसुंदर ताथोडे म्हणाले, ‘‘उत्पादनात ६० ते ७० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता आहे. फळगळती रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे, अन्यथा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल.’’.उत्पादन घटल्यास बाजारभावात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असली तरी, प्रत्यक्षात उत्पादन कमी झाल्याने शेतकऱ्यांचे एकूण उत्पन्न घटण्याचीच भीती वर्तवली जात आहे. व्यापाऱ्यांच्या मते, आवक कमी झाल्यास दरात सुधारणा होऊ शकते; मात्र उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांना त्याचा फारसा फायदा होणार नाही. ‘‘दरवर्षीपेक्षा यंदा तापमान अधिक असल्याने झाडांवर फळे टिकून राहत नाहीत. त्यामुळे उत्पादन घटून आर्थिक फटका बसणार आहे,’’ असे मत राजुरा येथील बागायतदार राजाभाऊ गुंडे यांनी व्यक्त केले..Orange Fruit Drop: फळगळतीने संत्रा उत्पादकांना फटका.‘‘उष्णतेमुळे फळगळती नैसर्गिक असली तरी योग्य व्यवस्थापन केल्यास नुकसान कमी करता येते. शेतकऱ्यांनी कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार उपाययोजना कराव्यात,’’ असे आवाहन तालुका कृषी अधिकारी रेहान मुजावर यांनी केले. एकूणच, तापमानामुळे संत्रा-मोसंबीवर मोठे संकट निर्माण झाले असून, उपाययोजना न केल्यास बागायतदारांना आर्थिक फटका बसण्याची चिन्हे आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.