Nagpur News: ‘बोगस सरकार, बोगस प्रशासन, ना शेतकरी खूष, ना जनता जनार्दन, बळीराजा आपल्या मातीत तडफडतोय, पॅकेज फडणवीसांचं असंच फसवतंय, असे फलक हातात घेत कर्जमाफी आणि मदतीची मागणी करत महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर मंगळवारी (ता. ९) जोरदार घोषणाबाजी केली. .हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पुरवणी मागण्यांमध्ये कृषी विभागाला निधी न दिल्याने आक्रमक झालेल्या विरोधकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली. कर्जमाफी, हमीभावावरूनही सरकारला प्रश्न विचारत घोषणाबाजी केली..कापसाच्या माळा गळ्यात घालून, कापूस आणि सोयाबीन हातात घेऊन विरोधक आक्रमक झाले. काँग्रेसचे विधानसभेतील गटनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील, आदित्य ठाकरे, शशिकांत शिंदे, हेमंत ओगले, ज्योती गायकवाड यांच्यासह आमदारांनी आंदोलन भाग घेतला..Farmers Protests: वीज आणि बियाणे विधेयकाविरुद्ध पंजाबमधील शेतकऱ्यांचा हल्लाबोल.राज्यात दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करत असताना सरकार लक्ष देत नाही. महायुती सरकार शेतकऱ्यांसाठी फक्त घोषणा करते. प्रत्यक्षात शेतकरी विरोधी धोरणे सरकार राबवित आहे, असा आरोप करत निदर्शने करण्यात आली..कर्जमापी शेतकऱ्याला तर देतच नाय, पॅकेज फणवसीांचं फसवं असतंय, वायफळ खर्च सरकार करतय, पॅकेज फडणवीसांचं फसवत असतंय, सोयाबनला नाही भाव, फडणवीस म्हणतात तुलाच ठावं, सोयाबीनला नाही भाव, सत्तेसाठी महायुतीची धावाधाव, बळीराजा आपल्या मातीत तफडफडतोय, असे फलक हातात घेऊन सदस्यांनी घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे. कापसाला, सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे, अशी घोषणाबाजी करत सभागृह सुरू होण्याआधी लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला..Adivasi Protest: प्रलंबित मागण्यांसाठी मेळघाटचे आदिवासी देणार नागपुरला धडक.मंत्री उपस्थित असताना इतर मंत्री कसे उत्तर देतात?विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंत्र्यांच्या कामकाजाचे वाटप जाहीर केले. यात बहुतांश मंत्री शिवसेनेचे होते. त्यास आक्षेप घेत ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी ‘संबंधित खात्याचे मंत्री सभागृहात हजर असताना इतर मंत्री उत्तरे देतात हे बरोबर नसल्याची नाराजी व्यक्त केली. सभागृहात ज्येष्ठ सदस्य असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्यासारखे नेतेही काही बोलत नाहीत..मंत्री विधान भवनाच्या आवारात असेल तरीही इतर मंत्र्यांनी उत्तर देऊ नये, अशी प्रथा आहे. तो विधिमंडळ आवाराबाहेर असतील तर अन्य मंत्र्यांना जबाबदारी दिली जाते. पण मंत्री असूनही दुसऱ्या मंत्र्यांना उत्तरे द्यायला लावणे बरोबर नाही, असा मुद्दा मांडला. मात्र सरकार म्हणून सामूहिक जबाबदारी असते. त्यामुळे अन्य मंत्र्यांना उत्तरे देण्यापासून मी रोखू शकत नाही, असे उत्तर विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी दिले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.