Mumbai News: राज्यातील १३ हजार कृषी कर्मचाऱ्यांना अखेर लॅपटॉप देण्याचा निर्णय कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी घेतला. कृषी विभागातील काही अधिकाऱ्यांनी लॅपटॉप ऐवजी टॅब देण्याचा प्रस्ताव मांडला होता. मात्र त्याविरोधात कृषी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी आक्रमक झाल्याने हा निर्णय मागे घ्यावा लागला. कृषिमंत्री श्री. भरणे यांच्या दालनात मंगळवारी (ता. ९) बैठक झाली..या वेळी कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी लॅपटॉप ऐवजी टॅब देणे फायदेशीर कसा आहे याचे सादरीकरण केले. मात्र कर्मचारी संघटनेने त्यास कडाडून विरोध केला. तत्कालीन कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अपरोक्ष लॅपटॉप ऐवजी टॅब द्यावा, असा बदल कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला. मात्र श्री. भरणे यांनी तो निर्णय मागे घेण्याचे आदेश दिले..Laptop Scheme: लॅपटॉप खरेदी प्रस्ताव दाबून ठेवला .राज्यात १० हजार ६२० सहायक कृषी अधिकारी, १,७७० उपकृषी अधिकारी आणि ८८५ मंडल कृषी अधिकारी असे १३ हजार २७५ कृषी कर्मचाऱ्यांना लॅपटॉप देणे विचाराधीन होते. प्रति लॅपटॉप ६० हजार रुपये अंदाजित रक्कम गृहीत धरून ७९.६५ कोटी रुपयांची गरज आहे. पण लॅपटॉप ऐवजी टॅबची सक्ती केली होती..Talathi Laptop Purchase: तलाठ्यांना मिळणार ९४ कोटींचे लॅपटॉप .काम करण्यास सोपे, सोबत हाताळण्यास हलके आणि काही फोटो काढून ते अपलोड करणे सोईचे असल्याचे अधिकाऱ्याचे म्हणणे होते. मात्र महाडीबीटी, पोकरा, क्रॉपसॅप, महाकृषी, महाविस्तार अॅप, एलएपी अॅप, एफएफएस अॅप आदी कृषी विभागाचे अॅप आणि योजनांच्या ऑनलाइन कामांसाठी ‘टॅब’ सोयीचा नाही. तसेच काही प्रकल्प अहवाल करण्यासाठी लॅपटॉप सोईचा असल्याचे मत महाराष्ट्र राज्य सहायक कृषी अधिकारी संघटनेचे अध्यक्ष विलास रिंढे यांनी मांडले..जे सोईचे तेच द्या : कृषिमंत्री भरणेकृषी विभागाचे प्रधान सचिव आणि कृषी आयुक्त टॅबसाठी तर कर्मचारी संघटना लॅपटॉपसाठी आग्रही होते. कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी लॅपटॉप वर काम करणे सोईचे असल्याचे आणि काम वेगाने होणार असल्याचा मुद्दा पटवून दिला. त्यामुळे कृषिमंत्री भरणे यांनीही तोच मुद्दा योग्य असल्याचे सांगत लॅपटॉप वितरण करा, असे आदेश दिले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.