Sangli News: सांगली जिल्ह्यात रब्बी हंगामातील पीक कर्जाचे वितरण ऑक्टोबरपासून सुरू झाले. नोव्हेंबरअखेर जिल्हा बॅंक, राष्ट्रीय, व्यापारी बॅंका, खासगी आणि ग्रामीण बॅंकांनी ५ हजार ५०६ शेतकऱ्यांना ६९२ कोटी २ लाख म्हणजे अवघे ५.१२ टक्के कर्जाचे वितरण केले आहे. .जिल्ह्यात रब्बीत १ लाख १५ हजार ७३२ शेतकऱ्यांना १३५२ कोटी १३ लाख कर्ज वितरणाचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी सर्वाधिक कर्जवाटप जिल्हा बॅंकेकडून केले जाणार आहे..जिल्हा बॅंकेला ६६ हजार ५३८ शेतकऱ्यांना ७६५ कोटी ५३ लाखांचे कर्ज वितरणाचा लक्ष्यांक आहे. .त्यानुसार पीक कर्जाचे वितरण ऑक्टोबरपासून जिल्हा बॅंक, राष्ट्रीय, व्यापारी बॅंका, खासगी आणि ग्रामीण बॅंकाकडून सुरू झाले. .Rabi Crop Loan: रब्बी पीककर्ज वितरण संथ गतीने.ऑक्टोबरमध्ये राष्ट्रीय, व्यापारी बॅंकांना ५.८६ टक्के कर्जवाटप केले. नोव्हेंबर महिन्यात कर्ज वितरणाची टक्केवारी तेवढीच असल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने दिलेल्या अहवालात नमूद केले..Rabi Crop Loan : खानदेशात रब्बी पीककर्ज वितरण अपूर्णच.तर जिल्हा बॅंकेने ऑक्टोबरमध्ये २.८९ टक्के कर्ज शेतकऱ्यांना वितरित केले होते. .जिल्हा बॅंकेने नोव्हेंबरमध्ये २.२८ टक्के इतके कर्ज वितरण केले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.