Solapur News: सोलापूर जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी आतापर्यंत फक्त १० हजार ५२९ शेतकऱ्यांना २१९ कोटी ५५ लाख ३५ हजारांचे पीककर्ज मिळाले आहे. उद्दिष्टाच्या तुलनेत ती केवळ नऊ टक्के आहे. आधीच्या कर्जाची वसुली थांबल्यामुळे रब्बी कर्जवाटप रब्बी कर्जवितरण संथगतीने सुरू असल्याचे बँकांचे म्हणणे आहे..अतिवृष्टीसह सततच्या पावसामुळे खरिपात पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे राज्य सरकारने पीककर्ज वसुलीला स्थगिती दिली. या दोन्ही कारणांमुळे रब्बी पीककर्ज वाटप अपेक्षित टप्पा गाठू शकला नाही. दरवर्षी या काळात होणाऱ्या पीककर्ज वाटपाच्या तुलनेत यंदाचे पीक कर्ज वाटप कमी आहे. यंदा रब्बीसाठी दोन हजार ३४० कोटी ७७ लाखांचे उद्दिष्ट जिल्ह्यातील बँकांना देण्यात आले होते. त्यापैकी २१९ कोटी ५५ लाखांचे वितरण झाले आहे..Rabi Crop Loan: रब्बी पीककर्ज वाटपातही बँकांचा हात आखडता.विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सत्ताधाऱ्यांनी केलेली कर्जमाफीची घोषणा व सत्तेवर आल्यानंतर पुनर्गठनाचा पर्याय दिला. यामुळे कर्जमाफी व कर्जवसुली याबाबत संभ्रमाची स्थिती आहे. तर शेतकरी कर्जमाफी मिळणार या शक्यतेने जुने कर्ज भरून नवे कर्ज घेण्याच्या विचारात नाहीत. रब्बी हंगामासाठी कर्जवाटपाची मुदत ३१ मार्चपर्यंत आहे. पुनर्गठनाचा पर्याय स्वीकारल्यास शेतकऱ्यांना १० ते ११ टक्के व्याज भरावे लागणार आहे. यंदा अतिवृष्टीचा बसलेला फटका पाहता त्यासाठीही शेतकरी राजी नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे येत्या काळातही पुरेसे कर्जवाटप होईल, अशी शक्यता दिसत नसल्याचे बँकांचे म्हणणे आहे..Rabi Crop Loan : सांगली जिल्ह्यात रब्बीचे केवळ अकरा टक्के कर्ज वितरण.डीसीसीकडून ५२ कोटींचे वाटप जिल्हा मध्यवर्ती बँकेला ४५ हजार ६१२ शेतकऱ्यांना ६३१.३२ कोटींचे कर्ज वितरणाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. बँकेने आतापर्यंत ५२.२७५७ कोटींचे कर्ज वितरण केले आहे. त्याची टक्केवारी आठ इतकी आहे..खरिपात ९० टक्के उद्दिष्टपूर्तीखरीप हंगामात दोन लाख २७ हजार ३३२ शेतकऱ्यांना २८ कोटी ५९ लाख २१ हजारांचे कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट जिल्ह्यातील बँकांना दिले होते. त्यापैकी एक लाख २७ हजार ९८२ शेतकऱ्यांना २५ कोटी ६९ लाख पाच हजारांचे कर्ज वाटप झाले. .त्याची टक्केवारी ९० इतकी आहे. रब्बी हंगामासाठी कर्ज हवे असलेल्या शेतकऱ्यांनी नजीकच्या बँकेतून कर्ज घ्यावे. कर्जदार शेतकऱ्यांनी जुने कर्ज भरून नवे कर्ज घ्यावे.- राम वाखरडे, जिल्हा व्यवस्थापक, अग्रणी बँक, सोलापूर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.