Pune News: पुणे विभागात रब्बी ज्वारीच्या पेरण्यांची लगबग सुरू झाली असली तरी जमिनीत ओल अधिक असल्याने अनेक ठिकाणी पेरण्या लांबल्या आहेत. आतापर्यंत ५ लाख २६ हजार ३३४ हेक्टरपैकी २ लाख १९ हजार ४५८ हेक्टर म्हणजेच अवघी ४२ टक्के रब्बी ज्वारीची पेरणी झाली आहे. .यंदा खरिपात नुकसान झाल्याने रब्बी हंगामात ज्वारी पेरणी क्षेत्र काही प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. त्यापाठोपाठ हरभरा, मका, गहू या पिकांची पेरणी होण्याची शक्यता आहे. विभागात अनेक ठिकाणी रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीस सुरुवात झाली असून ज्वारी पीक, गहू व हरभरा पिके उगवण अवस्थेत आहे. पेरणी झालेले मका पीक वाढीच्या अवस्थेत आहे..Rabi Jowar Sowing: अतिवृष्टीमुळे ज्वारी पेरणीला जमीन प्रतिकूल; शेतकरी हरभरा आणि गव्हाकडे वळले.पुणे जिल्ह्यात खरीप हंगामातील भात पीक काढणीच्या व दाणे पक्वतेच्या अवस्थेत आहे. तूर पीक पक्वतेच्या अवस्थेत आहे. जिल्ह्यात खरीप पिकांची काढणी पूर्ण झाली असली तरी ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसामुळे रब्बी हंगामाच्या पिकांची पेरणी लांबली आहे. खेड, आंबेगाव, शिरूर, बारामती, पुरंदर, जुन्नर, इंदापूर, दौंड भागात काही प्रमाणात पेरण्या झाल्या आहेत..सोलापूर जिल्ह्यामध्ये खरीप हंगामातील तूर पीक शेंगाच्या अवस्थेत आहे. तर कापूस पीक फुटलेले असून काही ठिकाणी अतिपावसामुळे नुकसान झाले आहे. या भागात मशागतीची कामे उशिराने सुरू झाल्याने पेरण्या धिम्या गतीने झाल्या आहेत. आतापर्यंत उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, अक्कलकोट, मोहोळ, माढा, सांगोला, मंगळवेढा या तालुक्यांत चांगल्या पेरण्या झाल्या आहेत. पंढरपूर, माळशिरस या तालुक्यांत पेरण्याचे प्रमाण कमी आहे..Rabi Sowing: कोल्हापुरात रब्बीची पेरणी ८ हजार ८९१ हेक्टरवर.नगरमध्ये जिरायती भागात रब्बी ज्वारीच्या लवकर पेरण्या झाल्या असल्या तरी बागायती भागात मात्र उशिराने झाल्या आहेत. मका व हरभरा पिकांच्या पेरणीस सुरुवात झाली आहे. नगर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, पाथर्डी, संगमनेर या भागांत बऱ्यापैकी पेरण्या झाल्या आहेत. तर शेवगाव, नेवासा, राहुरी, अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर, राहाता भागांत ओल अधिक असल्याने उशिराने पेरण्या सुरू झाल्या आहेत..रब्बी ज्वारीची झालेली पेरणी, हेक्टरमध्ये :जिल्हा सरासरी क्षेत्र पेरणीचे क्षेत्र टक्केवारीनगर १,६२,९०९ ४८,२५३ ३०पुणे ८८,३३७ ४९,५५२ ५६सोलापूर २,७५,०८८ १,२१,६५४ ४४एकूण ५,२६,३३४ २,१९,४५८ ४२.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.