Amravati News: ऑगस्ट महिन्यात अकरा दिवसांपैकी केवळ चार दिवस पाऊस झाला असून तो सरासरी इतकाही झालेला नाही. सात दिवसांचा पावसाचा खंड आहे. अपेक्षित पर्जन्यमानाच्या तुलनेत ११ टक्के पाऊस झाला. त्यामुळे वाढीच्या अवस्थेत असलेली पिके धोक्यात येऊ लागली असून त्याचा परिणाम उत्पादन सरासरीवर होण्याची शक्यता आहे..जून व जुलैमध्ये पावसाची तूट आहे. ही तूट ऑगस्टमध्ये भरून निघेल, असा अंदाज होता. ऑगस्टमध्ये अकरा दिवसांत १०१ मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताना केवळ ३२.५ मिलिमीटर पाऊस झाला आहे, तर महिन्याच्या अपेक्षित पर्जन्यमानाच्या तुलनेत तो ११ टक्के आहे. या कालावधीत ३० ते ३५ टक्के पाऊस होणे अपेक्षित होते..Rainfall Deficit : पावसाची तूट; दुष्काळाचे सावट गडद.रोज जिल्ह्याच्या काही भागांत हलक्या स्वरूपाचा पाऊस होत असला तरी पिकांच्या वाढीसाठी २.५ मिलिमीटर पावसाची गरज असताना ती पूर्ण होत नसल्याचे चित्र आहे. जूनमध्ये १२ व जुलैमध्ये १९ दिवस पाऊस झाला असून पुरेसा न झाल्याने तूट कायम आहे..सोयाबीन, तूर व कापूस ही खरीप हंगामातील मुख्य पिके आहेत. यासह धान, मका, ज्वारी, मूग आणि उडदाचीही पेरणी झाली आहे. ही सर्व पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. सोयाबीनचे पीक काही भागांत फुलोऱ्यावर आले आहे. या स्थितीत पावसाची नितांत गरज असताना पाऊस मात्र बेपत्ता आहे. समाधानकारक पाऊस होत नसल्याने पिकांच्या उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे..Marathwada Rainfall : मराठवाड्यात अपेक्षेच्या तुलनेत पावसाची तूटच.जिल्ह्यातील पीकपरिस्थितीजिल्ह्यात दोन लाख ४५ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली असून अचलपूर, नांदगाव खंडेश्वर, तिवसा, धामणगावरेल्वे तालुक्यात हूमणी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. अमरावती तालुक्यात या अळीच्या प्रादुर्भावाने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली आहे. दर्यापूर तालुक्यात चक्रिभुंगा किडीचा प्रादुर्भाव झाला आहे..काही भागांत पीक फुलोऱ्यावर आले असून पावसाने हजेरी न लावल्यास परिणाम होण्याची शक्यता आहे. दोन लाख ४० हजार हेक्टरवर कापसाची पेरणी असून अचलपूर, तिवसा, नांदगाव खंडेश्वर तालुक्यांत रसशोषक अळीचा काही प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. इतर पिकेही वाढीच्या अवस्थेत असून परिस्थिती समाधानकारक दिसत असली तरी पावसाची गरज आहे..अडीच महिन्यातील पावसाची स्थितीमहिना पावसाचे दिवस प्रत्यक्षात झालेले दिवस टक्केजून ३० १२ ७२जुलै ३१ १९ ८०ऑगस्ट ३१ पैकी ११ ४ ११.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.