Nagpur News: शेती प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी पूर्व विदर्भात १ हजार ३८० प्रस्ताव पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेअंतर्गत सादर करण्यात आले. मात्र मागील आठ महिन्यांत यातील केवळ ३६३ उद्योगांनाच मंजुरी देत बँकांकडून कर्ज उपलब्ध करण्यात आले. ही टक्केवारी केवळ १० टक्के आहे..शेती उत्पादनावर प्रक्रिया करून आर्थिक स्थैर्य निर्माण व्हावे यासाठी शासनाने पंतप्रधान फॉर्मलायझेशन ऑफ मायक्रो फूड प्रोसेसिंग एंटरप्राइजेस (पी.एम.एफ.एम.ई) या महत्त्वाकांक्षी योजना आखली. योजनेअंतर्गत सूक्ष्म व घरगुती स्तरावर चालणाऱ्या उद्योगांना कर्ज, अनुदान आणि तांत्रिक साहाय्य उपलब्ध करून देण्याचा सरकारचा उद्देश आहे. .Farmer Loan Waiver: कर्जमाफीचे आश्वासन बँकांच्या मुळावर.मात्र प्रत्यक्षात बँकांकडून दस्तऐवज, हमी, तारणातून अडथळे निर्माण होत असल्याने लाभार्थ्यांना कर्ज मिळण्यासाठी खूप धडपड करावी लागत आहे. अनेक उद्योजकांनी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन असूनही प्रत्यक्षात शाखांमध्ये वारंवार पाठपुरावा करावा लागत असल्याच्याही तक्रारी आहे..पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर मसाले, पापड, लोणचे, धान्य प्रक्रिया, दुग्धजन्य पदार्थ व कुटीराधारित खाद्य व्यवसाय चालतात. योजनेतून यांना आधुनिक उपकरणे, पॅकेजिंग युनिट्स, मार्केटिंग साहाय्य मिळणे अपेक्षित होते. पण निधी मंजूर न झाल्याने उद्योग रखडल्याचे चित्र आहे..NPA Banks : सहकारी बँकांच्या `एनपीए`मध्ये सव्वाचार टक्के घट : अर्थराज्यमंत्री कराड.७५७ प्रस्ताव बँकांकडे पडूनपूर्व विदर्भात सुमारे १३८० सूक्ष्म प्रक्रिया उद्योगांनी बँकांकडे आर्थिक साहाय्यासाठी अर्ज सादर केले. त्यापैकी केवळ ३६३ उद्योगांना मंजुरी मिळाली तर ७५७ उद्योगांचे प्रस्ताव विविध कारणांसाठी बँकांकडे पडून आहेत. बँकांच्या संथ गतीमुळे योजनेंतर्गत उद्दिष्टांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे..तालुका प्राप्त प्रस्ताव प्रलंबित मंजूरनागपूर ३४२ १८८ ७४वर्धा २१९ १०४ ५६चंद्रपूर २३७ १९२ ८३.भंडारा १८७ ६२ ३३गोंदिया २९१ १३९ ७७गडचिरोली १०४ ७२ ४०.निम्म्यापेक्षा जास्त प्रस्ताव बँकांकडे प्रलंबित आहेत. ते निकाली काढण्यासाठी तालुकास्तरावर आणि जिल्हास्तरावर हा विषय रेटून धरण्यात येत आहे. मात्र बँकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही.- मिलिंद शेंडे, विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी, नागपूर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.