Fertilizer Management: ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ या ॲपच्या माध्यमातून रासायनिक खत खरेदीसाठी शेतकरी पुढे येत असून, ऑनलाइन खत खरेदीला आता चांगली गती मिळत आहे. विशेषतः छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात या प्रक्रियेला अधिक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे..''फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल'' या ॲपद्वारे रासायनिक खत खरेदीची प्रायोगिक अंमलबजावणी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांची निवड करण्यात आली. ५ जूनपासून या दोन्ही जिल्ह्यांत ऑनलाइन खत खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात आली..Online Fertilizer Purchase: खत खरेदीत नाकीनऊ.सुरुवातीच्या काळात ऑनलाइन खरेदी प्रक्रियेत विविध तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने शेतकरी, कृषी निविष्ठा विक्रेते, विविध संघटना आणि राजकीय पक्षांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. या अडचणी दूर करण्यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या स्तरावर तांत्रिक यंत्रणेमार्फत उपाययोजना करण्यात आल्या..खासदार डॉ. कल्याण काळे यांनी खरीप हंगामाचे महत्त्व लक्षात घेऊन शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींबाबत केंद्रीय रसायन व खत मंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. तसेच कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी आंदोलनाची तयारी केल्यानंतर प्रशासनाने त्यांच्या समस्या तातडीने सोडविण्याचे आश्वासन दिले.सध्या ऑनलाइन खत खरेदी पुन्हा सुरू झाली असून सुरुवातीच्या बहुतांश अडचणी दूर झाल्या आहेत. मात्र आधारकार्डवरील ओटीपी मिळण्यास विलंब होणे, साठा आणि ऑनलाइन नोंदीमध्ये तफावत राहणे, उपलब्ध नसलेले खत बुक होणे किंवा उपलब्ध साठा असूनही बुकिंग न होणे अशा काही तांत्रिक समस्या अद्यापही कायम आहेत. या बाबी वरिष्ठ स्तरावर निदर्शनास आणून देण्यात आल्या असून त्या दूर करण्याचे काम सुरू असल्याची माहिती कृषी विभागाने दिली..QR Code Fertilizer Distribution: कोल्हापुरात जिल्ह्यात क्यूआर कोडद्वारे खत वितरण सुरू.आतापर्यंत ३७ हजार ५०० टन खताची खरेदी २६ जूनअखेर छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांतील १ लाख ६१ हजार ४३६ शेतकरी प्रयत्नांद्वारे ६० हजार १२४ टन खताचे बुकिंग करण्यात आले. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १ लाख ९ हजार ८३६ शेतकऱ्यांनी ४९ हजार ८८२ टन, तर कोल्हापूर जिल्ह्यातील ५१ हजार ६०० शेतकऱ्यांनी १० हजार २४२ टन खताचे बुकिंग केले. यापैकी ९६ हजार ९४ शेतकरी प्रयत्नांद्वारे प्रत्यक्ष ३७ हजार ५०० टन खताची खरेदी करण्यात आली. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ६३ हजार ५१५ शेतकऱ्यांनी ३० हजार ८३८ टन, तर कोल्हापूर जिल्ह्यातील ३२ हजार ५७९ शेतकऱ्यांनी ६ हजार ६६३ टन खताची खरेदी केल्याची माहिती कृषी विभागाने दिली. .एकाच दिवशी २,३२६ टन खत खरेदी कृषी विभागाच्या माहितीनुसार, २६ जून रोजी दोन्ही जिल्ह्यांत ॲपच्या माध्यमातून ८,३४७ शेतकऱ्यांनी २,८९२ टन खताचे बुकिंग केले. त्यापैकी ६,७९६ शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष २,३२६ टन खताची खरेदी केली. यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ४,२९५ शेतकऱ्यांनी १,८४६ टन, तर कोल्हापूर जिल्ह्यातील २,५०१ शेतकऱ्यांनी ४८१ टन खताची खरेदी केली. .ॲपच्या माध्यमातून ऑनलाइन खत खरेदीला आता चांगली गती मिळत आहे. इंटिग्रेटेड फर्टिलायझर मॅनेजमेंट सिस्टिम (IFMS) आणि फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल या दोन्ही प्रणालींमधील माहिती एकमेकांशी जोडण्याची (Auto Sync) प्रक्रिया सुरू आहे. ती पूर्ण झाल्यानंतर खत साठ्याची माहिती अचूकपणे उपलब्ध होईल आणि उर्वरित तांत्रिक अडचणीही दूर होतील. - प्रकाश पाटील, कृषी विकास अधिकारी, जि. प. छत्रपती संभाजीनगर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.