Unseasonal Rain Impact: लोहगाव, जि. छत्रपती संभाजीनगर : गेल्या आठवड्यात झालेल्या पूर्वमोसमी पावसाच्या तडाख्यात सापडलेल्या कांदा पिकाचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी दिवस-रात्र मेहनत घेतली. तरीही काही प्रमाणात कांदा भिजल्याने शेतशिवारात त्याची प्रतवारी करण्यासाठी सध्या लगबग सुरू आहे..लोहगाव महसूल मंडलात ३० मार्च रोजी सायंकाळी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात झालेल्या पूर्वमोसमी पावसामुळे गहू, बाजरी, मका ही पिके आडवी झाली, तर फळपिकांचेही मोठे नुकसान झाले..Onion Harvesting: लाल कांद्याच्या काढणीला वेग.काढणीस आलेल्या उन्हाळी कांदा पिकालाही याचा मोठा फटका बसला. अनेक शेतकऱ्यांनी मजूर महिलांच्या समूहाकडून एकरी सुमारे १३ हजार रुपये दराने कांदा उपटणी व कापणी करून ढीग (पोळ) टाकले. त्यानंतर पिकाचे संरक्षण करण्यासाठी ताडपत्री व इतर साहित्य खरेदी करत अतिरिक्त खर्च सहन करावा लागला..Rabi Onion Harvesting: उन्हाळ्यात रब्बी कांद्याची काढणी आणि काढणीपूर्व नियोजन कसे करावे?.एवढी धावपळ करूनही अद्याप शासन यंत्रणेकडून नुकसानीचे पंचनामे करण्यात आले नसल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे..दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून वातावरण स्वच्छ झाल्याने लोहगाव व परिसरातील शेतांमध्ये कांदा काढणी, खराब कांद्याची निवड व प्रतवारी, चाळीत भरणे तसेच आडवी पडलेली गहू, बाजरी आदी पिकांची सोंगणी व हार्वेस्टिंगची कामे वेगाने सुरू झाली आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.