Crop Damage in Onion Seed Production Sector: जळगाव जिल्ह्यात यंदा वादळी पाऊस आणि गारपिटीसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे कांदा बीजोत्पादनामध्ये अडचणी येत आहेत. परागीभवनासाठी मधमाश्यांनी पाठ फिरवल्याने ही समस्या बिकट बनली आहे, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली. जिल्ह्यात सुमारे दीड हजार हेक्टरवर कांदा बीजोत्पादनासाठी कांदा बल्बची लागवड झाली होती..काही भागांत आगाप लागवडदेखील झाली. अनेक खरेदीदार कंपन्यांनी दरांची हमी दिली होती. शिवाय, बियाण्यासाठी कांदा किंवा कांदा बल्बचा पुरवठादेखील केला होता. पण सद्यःस्थितीत कांदा दर अनिश्चित आहेत. त्याचा परिणाम बीजोत्पादन क्षेत्रावर होऊन ते कमी झाले..Rabi Crop Damage : देशातील २.४९ लाख हेक्टरवरील पिकांना अवकाळी आणि गारपीटीचा फटका; केंद्रीय कृषिमंत्री चौहान यांनी दिली मदतीची ग्वाही.क्षेत्रात घट२०२३ आणि २०२४ या दोन वर्षांमध्ये कांदा बीजोत्पादन क्षेत्र जिल्ह्यात दोन हजार हेक्टरपर्यंत होते. कांदा लागवडीऐवजी अनेक शेतकरी कांदा बीजोत्पादनाकडे वळले होते. पण आता क्षेत्रात घट झाल्याचे चित्र आहे. यंदा लागवड सुमारे २०० ते ३०० हेक्टरने कमी झाल्याची माहिती आहे. यावल, जळगाव, चोपडा, पाचोरा, जामनेर आदी भागांतील शेतकऱ्यांनी कांदा बीजोत्पादनाकडे पाठ फिरवली..Onion Crop Damage: ढगाळ हवामानाचा कांदा पिकाला फटका.कंपन्यांकडून दरनिश्चितीकांदा बीजोत्पादनाबाबत खरेदीदारांनी विविध दर ठरविले आहेत. बीजोत्पादनात काढणीसाठी यंत्रणा, मजूर उपलब्ध करून देण्याची हमीदेखील त्यांनी दिली होती. तसेच थेट जागेवर खरेदी करण्याचे आश्वासनही दिले होते..पण यंदा बीजोत्पादन क्षेत्रातच घट झाल्याने आपसूकच त्याचा परिणाम बीजोत्पादनावरही होणार आहे. या उत्पादन घटीच्या अनुषंगाने कंपन्यांनी भरपाई द्यावी, असा मुद्दाही संबंधित शेतकऱ्यांकडून उपस्थित होत असल्याचे सूत्रांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.