Maharashtra onion farmers seed price: जळगाव खानदेशात अनेक कांदा बियाणे उत्पादक कंपन्यांनी शेतकऱ्यांसोबत कांदा बिजोत्पादनाचे करार करून बियाण्याची उपलब्धता करून घेतली आहे. यातील काही कंपन्यांनी शेतकऱ्यांकडून बियाणे ५०० ते ७०० रुपये प्रतिकिलो दराने खरेदी केले. याच बियाण्याची बाजारात मात्र चढ्या दराने विक्री सुरू आहे..सध्या कांदा बियाण्याची तब्बल १२००, १५०० ते २००० रुपये प्रतिकिलो दराने विक्री केली जात आहे. बियाण्याच्या उगवण क्षमतेची हमीदेखील कंपन्यांकडून दिली जात नाही. गेल्या वर्षी बियाण्याच्या उगवण क्षमतेबाबत अनेक तक्रारी होत्या. मात्र, एकाही शेतकऱ्याला यासंबंधीची भरपाई कांदा बियाणे कंपनीकडून मिळाली नाही. यंदाही परिस्थिती जैसे थे आहे..Agriculture Market Slowdown: शेतकरी थांबला अन् कृषी बाजारही ठप्प झाला.खानदेशातील शेतकरी कांदा लागवडीच्या तयारीला लागले आहेत. याचवेळी बियाणे कंपन्या मात्र आपल्या नफ्याची गणिते आणि आडाखे बांधून मोकळ्या झाल्या आहेत. यंदाही शेतकऱ्यांना बियाणे अधिक दराने खरेदी करावे लागत आहे.बियाण्याच्या दरांवर नियंत्रण असावे, तसेच उगवण क्षमता आणि गुणवत्तेची हमीदेखील बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांना मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. अन्यथा कांदा बियाणे कंपन्यादेखील सोयाबीन बियाणे कंपन्यांप्रमाणे मोकाट सुटतील, असा मुद्दा शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे..Onion Price Update: नाशिकमध्ये कांदा दरात सुधारणा.उत्पादक कंपन्यांची मनमानीखानदेशात कांदा बियाणे उत्पादक आणि पुरवठादार कंपन्यांनी शेतकऱ्यांसोबत बिजोत्पादनाचे करार केले होते. डिसेंबर-जानेवारीमध्ये यासंबंधीची लागवड करण्यात आली होती. त्यासाठी अव्वाच्या सव्वा दराने कांदा बल्ब (बिजोत्पादनासाठी आवश्यक कांदा) शेतकऱ्यांना पुरविण्यात आला. तसेच मागणीनुसार कीडनाशके आणि खतेही पुरविण्यात आली. मळणीच्या वेळी संबंधित कंपनीचे कर्मचारी शेतात उपस्थित राहायचे..त्यांच्या निगराणीखाली बियाणे मळणी आणि इतर कार्यवाही केली जायची. शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, याची पूर्ण खबरदारी या कंपन्यांनी घेतली. बिजोत्पादनाचा करार केलेल्या शेतकऱ्यांकडून या बियाण्याची खरेदी संबंधित कंपन्यांनी ३८०, ४०० ते ५०० रुपये प्रतिकिलो दराने केली. त्यात काही अलेखित शुल्कही (हिडन चार्जेस) आकारण्यात आले.त्यामुळे शेतकऱ्यांना हे बियाणे प्रत्यक्षात ३५० ते ३६० रुपये ते ४५० रुपये प्रतिकिलो दराने पडले. त्यासाठी एकरी ४० ते ४५ हजार रुपये उत्पादन खर्च आला. एकरी उत्पादन दीड ते दोन क्विंटल एवढेच मिळाले. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी नफा राहिला. हेच बियाणे आता बाजारात चढ्या दराने विकले जात आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.