Hailstorm Rain Impact: परिसरात पूर्वमोसमी पाऊस व गारपिटीमुळे कांदा बियाणे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे..किन्हीराजा गावासह मैराळडोह, एरंडा, सोनाला, रामराववाडी आणि पिंपळशेंडा या गावांमध्ये सुमारे १००० एकर क्षेत्रावरील पीक बाधित झाल्याचा अंदाज आहे. सलग तीन दिवस पाऊस आणि एक दिवस गारपीट झाली होती. या आपत्तीने शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे..Onion Care in Rain: गारपीट आणि अवकाळीमध्ये कांदा पिकाचे नियोजन कसे करावे?.कांदा बीजोत्पादन हे अत्यंत खर्चिक पीक असून बियाणे, मजुरी, कीटकनाशके आणि पाणी व्यवस्थापनासाठी मोठी गुंतवणूक करावी लागते. .Unseasonal Rain Impact: अवकाळी पावसात कांदा पिकाची काळजी कशी घ्याल?.मात्र पावसाच्या जोरदार सरी आणि गारांमुळे कांद्याच्या फुलातील बी खाली पडून जमिनीत मिसळले आहे. तसेच परिपक्वतेच्या अवस्थेतील कांदे मोडून पडल्याने उत्पादन प्रक्रिया खंडित झाली आहे..चिंतेची बाब म्हणजे या पिकासाठी पीकविमा योजना लागू नसल्याने शेतकऱ्यांना कोणतीही भरपाई मिळणार नाही. त्यामुळे शेतकरी शासनाच्या मदतीवर अवलंबून आहेत. शेतकरी गणेशराव घुगे यांच्यासह अनेकांचे नुकसान झाले आहे. शासनाकडून तातडीच्या मदतीची मागणी केली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.