डॉ. दत्तात्रय गावडेभाजीपाला पिकांमध्ये कांद्याला अग्रणीस्थान आहे. कांद्याला वर्षभर चांगली मागणी असते. मागील काही वर्षांत हवामान बदलामुळे कांद्याची उत्पादकता कमी होत चालली आहे. यामागे प्रामुख्याने हवामानाबदल, कीड-रोगांचा वाढता प्रादुर्भाव, संकरित जातीचा अभाव तसेच सुधारित तंत्र वापरण्याबाबत उदासीनता इ. अनेक बाबींचा समावेश येतो. .कांदा पिकांमध्ये प्रतिकूल हवामानात अनेक रोगांचा प्रादुर्भाव होतो. विविध रोगांमुळे कांदा पिकात सुमारे ५० ते ८० टक्क्यांपर्यंत नुकसान होत असल्याचे दिसून आले आहे. रोगांचा प्रभाव हा मुख्यत्वेकरून कांद्याचे उत्पादन, प्रत, साठवण आणि बाजारभाव या बाबींवर होत असतो. पिकाच्या रोपावस्थेपासून ते साठवणीपर्यंत अनेक रोगांचा उपद्रव कांद्यावर होतो. यामध्ये करपा रोगाचा प्रादुर्भाव सर्वाधिक दिसून येतो. यामध्ये काळा करपा, तपकिरी करपा, जांभळा करपा यांचा समावेश होतो. या रोगाची पिकावरील लक्षणे माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. जेणेकरून नुकसानीच्या प्रकारानुसार प्रभावी उपाययोजना करणे शक्य होईल..Onion Farming: कांदा लागवडीसाठी तारेवरची कसरत.काळा करपा (Anthracnose)रब्बी व उन्हाळी कांदा लागवडीत या रोगाचा प्रादुर्भाव अधिक होताना दिसून येत आहे. या रोगाला ‘पीळ पडणे’ असेही म्हणतात.रोगकारक बुरशी ः कोलिटोट्रायकम ग्लेओस्पोराईडस (Colletotrichum gleosporides).लक्षणेरोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर सुरुवातीला पानाच्या बाहेरील बाजूवर व बुडख्याजवळील भागावर राखाडी रंगाचे ठिपके दिसतात. त्यावर लहान गोलाकार आणि उठावदार ठिपके वाढू लागतात. या काळ्या बुरशीचे प्रमाण वाढल्यावर पाने वाळतात.रोगट पात आकुंचल्यासारखी होऊन कोलमडते, रोपाची मान लांबट होऊन पात वेडीवाकडी होते. पाने वेडीवाकडी झाल्यामुळे कांद्याची वाढ होत नाही.हा रोग रोपवाटिकेतील रोपावर देखील येतो. त्यामुळे रोपांची पाने काळी पडून वाळतात, रोपे मरतात..Onion Farming: रब्बी हंगामातील कांदा लागवड स्थिर राहण्याचा अंदाज.पोषक हवामानदमट आणि उबदार हवामानात या रोगाच्या बुरशीची वाढ झपाट्याने होते.पाण्याचा निचरा न होणे, ढगाळ वातावरण आणि सतत रिमझिम पाऊस यामुळे रोगाचे प्रमाण वाढते.प्रसारहा रोग कुजलेल्या झाडांचा भाग, रोपवाटिकेतील रोप आणि कांदा या मार्फत पसरतो. तसेच जमिनीतून पावसाच्या थेंबामार्फत एक झाडावरून दुसऱ्या झाडावर पसरतात..तपकिरी करपा (Stemphylium Blight)रोगकारक बुरशी ः स्टेम्फीलीयम व्हासिकॅरियम (Stemphylium Vasicarium)लक्षणेया रोगाचा प्रादुर्भाव कांदा पिकावर तसेच बियाण्याच्या पिकावर मोठ्या प्रमाणात होतो.पानांवर पिवळसर, तपकिरी रंगाचे लांबट चट्टे बाहेरील भागांवर दिसू लागतात. चट्ट्यांचा आकार वाढत जाऊन पाने सुकू लागतात.फुलांच्या दांड्यावर हा रोग आल्यास फुलांचे दांडे मऊ होतात. त्याजागी वाळून मोडतात.या रोगाच्या प्रादुर्भावामुळे सुमारे ८० ते ९० टक्क्यांपर्यंत बियाणे उत्पादनात घट होते..Onion Farming: कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांची तारेवरची कसरत.पोषक हवामानसाधारण १५ ते २० अंश सेल्सिअस तापमान व ८० ते ९० टक्के आर्द्रतेत रोगाची झपाट्याने वाढ होते. हा रोग हवेद्वारे पसरतो.जांभळा करपा (Purple Blotch)रोगकारक बुरशी ः अल्टरनेरिया पोराय (Alternaria porri).लक्षणेहा रोग पिकांच्या कोणत्याही अवस्थेत येतो. या रोगामुळे पिकाचे सुमारे ५० ते ६० टक्क्यांपर्यंत नुकसान होते.पानावर सुरुवातीला खोलगट, लांबट पांढुरके चट्टे पडतात. चट्ट्यांचा मधला भाग सुरुवातीस जांभळट व नंतर काळपट होतो. असे अनेक चट्टे एकमेकांत मिसळून पाने करपतात, वाळतात.झाडांच्या माना मऊ पडतात. फुलांचे दांडे मऊ पडल्याने वाकतात किंवा मोडून पडतात.हा रोग झाडांचा कुजलेला पालापाचोळा व फांद्या यांच्यावर १२ महिन्यांपर्यंत राहतो. तसेच बियाण्यांतून हवेद्वारे हा रोग पसरतो. अनुकूल वातावरण मिळताच प्रादुर्भाव वाढतो.बीजोत्पादनासाठी लावलेल्या कांदा पिकावर देखील प्रादुर्भाव होतो..पोषक हवामानरोगांच्या बुरशीच्या वाढीसाठी १८ ते २० अंश सेल्सिअस तापमान व ८० टक्के आर्द्रता असल्यास प्रादुर्भाव वाढतो..एकात्मिक उपाययोजनापाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीl लागवड करावीलागवड सरी वरंब्यावर करावी.कांदा रोपवाटिका गादीवाफ्यावर तयार करावी.वाफ्यामध्ये पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी.पुनर्लागवड करताना रोपे कार्बेन्डाझिम (०.१ टक्का) १ ग्रॅम प्रति लिटर पाण्याचे द्रावण करून त्यात १० ते १५ मिनिटे बुडवून नंतर लागवड करावी.दर २० ते २५ दिवसांनी तण नियंत्रण करावे.कांदा पिकांची दर दोन ते तीन वर्षांनी फेरपालट करावी.प्रभावी रोग व्यवस्थापनासाठी एका भागातील शेतकऱ्यांनी एका ठरावीक वेळेत नियंत्रणाचे उपाय केल्यास रोगाचे व्यवस्थापन चांगले होऊ शकते.- डॉ. दत्तात्रय गावडे, ९४२१२ ७०५१०(पीक संरक्षण विषयतज्ज्ञ,कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव, पुणे).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.