Market Price Issue: यंदा अतिवृष्टीने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. गावरान कांद्यासह खरीप, लेट खरिपातील लाल काद्याला मोठा फटका बसला. त्यात निर्यातबंदी, कीड-रोग, खते, बियाणे, मशागत खर्चात झालेली वाढ यामुळे अगोदरच गोत्यात आलेला शेतकरी आता कमी दरामुळे नाडला जात आहे.