NAFED Onion Scam : भोंदू अशोक खरात याने बोगस ‘फार्मर प्रोड्युसर कंपन्या’ स्थापन करून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पक्ष, अहिल्यानगर यांच्या वतीने विशेष तपासणी पथकाकडे तक्रार दाखल करण्यात आली असून कारवाईची मागणी केली आहे..तक्रारीनुसार, खरातने ‘श्रीवेंकटेश्वर’ आणि ‘ईशान्येश्वर’ यांसारख्या दोन प्रमुख कंपन्यांसह सुमारे १५ ते १६ शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन केल्या होत्या. या कंपन्यांच्या माध्यमातून त्याने केंद्र शासनाच्या शासननियुक्त संस्था ‘नाफेड’ आणि ‘एनसीसीएफ’कडून कांदा खरेदीचे कंत्राट मिळवले. विशेष म्हणजे, ७० कोटींची उलाढाल असूनही वेंकटेश्वर कंपनीने केवळ ८ हजार रुपये नफा दाखवला आहे. .Onion Procurement Scam: कांदा खरेदीतील आर्थिक गैरव्यवहारामुळे ‘नाफेड गो बॅक’.तसेच अनेक कंपन्यांनी मागील तीन वर्षांचे ऑडिट रिपोर्ट सादर केलेले नाहीत. कांदा खरेदीत शेतकऱ्यांचा गट क्रमांक न नोंदवता केवळ ७/१२ अशी जुजबी नोंद करून मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे..Onion Procurement Scam: नाफेड’, ‘एनसीसीएफ’ कांदा खरेदीत परप्रांतीय रॅकेट.राजकीय संगनमताची चौकशी करण्याची मागणीभोंदू खरातला ही कंत्राटे मिळवून देण्यासाठी कोणत्या राजकीय नेत्यांनी मदत केली, याची सखोल चौकशी करण्याची मागणी जिल्हाध्यक्ष नीलेश शेडगे यांनी केली आहे. या घोटाळ्यात सहभागी असलेले खरात, संबंधित राजकीय नेते आणि नाफेड-एनसीसीएफच्या दोषी अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी उपविभागीय पोलिस अधिकारी जयदत्त भवर यांच्यामार्फत करण्यात आली आहे. .या तक्रार अर्जावर शेडगे, महिला आघाडीच्या सुनीता वानखेडे, नवनाथ दिघे, प्रकाश जाधव, श्रीराम त्रिवेदी, रवी वानखडे, मयूर भनगडे आदी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.