Jalgaon News : खानदेशातील प्रमुख बाजारांत कांद्याची आवक स्थिर आहे. दरात मात्र अपेक्षित वाढ, सुधारणा नसल्याने उत्पादक अडचणीत येत आहेत. सरासरी दर सध्या १२०० रुपये प्रतिक्विंटल, असे कांद्याला आहेत. .कमाल दर १६०० व किमान दर ७०० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत. कांद्याची आवक खानदेशात रोज मिळून २१०० क्विंटल एवढी आहे. सर्वाधिक आवक धुळे जिल्ह्यात होत आहे. धुळे जिल्ह्यात पिंपळनेर (ता.साक्री) व धुळे बाजार समितीसह अन्य खासगी बाजारांत दीड हजार क्विंटलपेक्षा अधिकची कांदा आवक आहे. .Onion Procurement Scam : ‘एनसीसीएफ’मध्ये कांदा खरेदीत कमिशनखोरी आता मनमानी.जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक आवक चाळीसगाव येथील बाजारात होत आहे. जळगाव येथेही रोज ३०० ते ३२० क्विंटल कांदा आवक आहे. तर यावल, चोपडा व अन्य भागातील बाजारांत मिळून रोज २०० ते २५० कांदा दरात मध्यंतरी सुधारणा झाली होती. परंतु नंतर दर वधारले नाहीत. कांदा दर कमाल २२०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले होते..Onion Subsidy : फेरछाननीअंती १४ हजार शेतकरी प्रलंबित कांदा अनुदानास पात्र .परंतु त्यात नंतर घसरण झाली असून, दरात नरमाई आल्याचे सांगितले जात आहे. जळगाव येथील बाजारातही कमाल दर १८०० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत. जळगाव येथे कांद्याची आवक छत्रपती संभाजीनगरातील सोयगाव, सिल्लोड भागातून होत आहे. तसेच यावल, चोपडा, जळगाव, धुळे जिल्ह्यातूनही कांदा जळगावात येत आहे..अनेक शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवला आहे. यातील कांद्याची विक्री दरात काही शेतकऱ्यांनी सुरू केली. एप्रिल ते जून या कालावधीत जळगाव, धुळे भगात कांद्याला सरासरी दर ९०० रुपये प्रतिक्विंटल, असा होता. या महिन्यात दरवाढ दिसली. परंतु त्यात चढउतार होत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.