Onion Prices : गेल्या काही दिवसांत कांद्याचे भाव घसरले आहेत. या पार्श्वभूमीवर, आंध्र प्रदेशमधील सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आंध्रचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी राज्य पणन विभागाला कांद्यासाठी प्रति क्विंटल १२०० रुपये किफायतशीर भाव सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत..Onion Market : थकित देयकांसाठी कांदा खरेदीदार आक्रमक .कांद्याचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. याची दखल घेत मुख्यमंत्री नायडू राज्य सचिवालयात पणन अधिकाऱ्यांसोबत सोमवारी आढावा बैठक घेतली. यात त्यांनी कांद्याचे भाव प्रति क्विंटल १,२०० रुपयांच्या खाली घसरू नयेत, यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.."जर शेतकऱ्यांनी त्यांचा कांदा खासगी व्यापाऱ्यांना प्रति क्विंटल १,२०० रुपयांहून कमी किमतीला विकला, तर सरकार त्यांना नुकसान भरपाई म्हणून फरकाची रक्कम देईल," असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. याबाबत राज्य सरकारने निवेदन जारी केले आहे..आंध्र प्रदेशातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या कुर्नूल येथे शेकडो क्विंटल कांदा पडून आहे. ३१ ऑगस्टपासून खरेदी सुरू केलेल्या आंध्र प्रदेश मार्केटिंग फेडरेशन (मार्कफेड) ने साठ्यामुळे कांद्याची खरेदी थांबवली आहे. परिणामी, शेतकऱ्यांना कांदा विक्रीसाठी पूर्णपणे खासगी व्यापाऱ्यांवर अवलंबून राहावे लागत आहे..कांदा खराब होऊ नये म्हणून शेतकऱ्यांना तो व्यापाऱ्यांकडे प्रति क्विंटल ३०० ते ६०० रुपये एवढ्या कमी भावात विकावा लागत आहे. हाच कांदा व्यापारी खुल्या बाजारात प्रति क्विंटल २५०० ते ३००० रुपयांना विकत आहेत, असे कुर्नूल येथील कांदा विक्रेत्याने म्हटले आहे. सरकारने कांद्यासाठी प्रति क्विंटल १२०० रुपये किमान आधारभूत किंमत (MSP) जाहीर केली असली तरी कांदा उत्पादकांना तेवढा भाव मिळत नसल्याचे त्यांनी नमूद केले..Onion Farming: साठवलेला कांदा सडू लागल्याने शेतकरी अडचणीत .एका दिवसात १६ हजार क्विंटल कांदा बाजारातकुर्नूल येथील शेतकऱ्यांच्या माहितीनुसार, गेल्या वर्षी कांद्याला प्रति क्विंटल ५ हजार रुपयांहून अधिक भाव मिळाला होता. गेल्या वर्षी चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली. यामुळे पीक उत्पादन वाढून बाजारात मोठी आवक झाली. शेतकऱ्यांनी कांदा शेतशिवारात विकण्याऐवजी थेट बाजारात आणला. आवक वाढल्याने कांद्याचे भाव गडगडले. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला.६ सप्टेंबर रोजी कुर्नूल बाजारात १६ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. बाजारात कांद्याचा साठा वाढला आहे, असे कुर्नूल मार्केट यार्डच्या सचिव जयलक्ष्मी यांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.