कांद्याचे यंदा बंपर उत्पादन मिळालेकांद्याची आवक वाढून दर निच्चांकी पातळीवर घसरलेकांद्यासाठी आधारभूत किंमत निश्चित करण्याची शेतकऱ्यांची मागणी.Onion Prices: कांद्याच्या बंपर उत्पादनामुळे कर्नाटकातील शेतकऱ्यांना यंदा त्यांच्या शेतमालास योग्य भाव मिळवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कांद्याचे भाव निचांकी पातळीवर घसरले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा उत्पादन खर्चही भरून निघाला नाही. अशा परिस्थितीत केंद्राच्या मदतीसाठी शेतकऱ्यांनी रक्ताने लिहिलेले एक पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले आहे. त्यांनी सरकारकडे कांद्यासाठी किमान आधारभूत किंमत (MSP) निश्चित करण्याची मागणी केली आहे..याआधी कांद्याचे भाव अनेकवेळा प्रति किलो १०० रुपयांवर गेल्याचे दिसून आले होते. पण, सध्या कल्याण कर्नाटकातील रायचूर, कोप्पल, विजयनगर आणि बळ्ळारी जिल्ह्यांमध्ये कांद्याचे भाव सरासरी प्रति किलो ५ रुपयांर्यंत खाली घसरले आहेत. येथील अनेक भागात, खरेदीदार मिळत नसल्याने कांदा पडून आहे..Onion Rate : बाजारभावाअभावी स्वप्नांवर पाणी .अधिक मिळालेल्या माहितीनुसार, यंदा बळ्ळारी आणि विजयनगर जिल्ह्यांमध्ये सुमारे ३५ हजार हेक्टर क्षेत्रावर कांदा पीक घेण्यात आले होते. यासाठी शेतकऱ्यांना प्रति एकर ४० हजार ते ५० हजार रुपये खर्च आला. त्यांना सरासरी उत्पादन ५०० क्विंटलपर्यंत मिळाल्याचा अंदाज आहे..५० किलो कांद्याची पिशवी घाऊक दरात केवळ १५० ते २०० रुपयांना विकली जात आहे. याचाच अर्थ प्रति किलो कांद्याला केवळ ३ ते ४ रुपये भाव मिळत आहे. जर भाव प्रति किलो ८ रुपयांहून अधिक मिळाला तरच उत्पादन खर्च भरून निघू शकतो, असे येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे..Onion Farmer : कांदा उत्पादकांची दिवाळी यंदा अंधारात .सध्या कांद्याचा काय आहे भाव?सततच्या पावसामुळे कांद्याचा दर्जा घसरला आहे. सध्या, कर्नाटकातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये हलक्या दर्जाचा नवीन कांदा प्रति किलो २ ते ५ रुपये प्रमाणे विकला जात आहे. तर मोठ्या आकाराच्या कांद्याचा भाव १० ते १७ रुपये आहे. तर महाराष्ट्रातून आलेला जुन्या कांद्याचा भाव प्रति किलो १७ ते १८ रुपये आहे..कांद्याचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटक कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष एनएम सिद्धेश यांनी नुकतेच पंतप्रधान मोदी यांनां रक्ताने लिहिलेले एक पत्र पाठवले. त्यात त्यांना कांदा पिकासाठी हमीभाव निश्चित करण्याची विनंती केली आहे. विजयनगर उपायुक्त कार्यालयामार्फत हे पत्र पंतप्रधान कार्यालयाला सादर करण्यात आले. त्यांना हमीभावात कांदा खरेदी केंद्रे सुरु करण्याची विनंतीही केली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.