Nashik News: राज्यात खरीप (पोळ) व लेट खरीप (रांगडा) कांद्याची आवक वाढल्याने बाजारभावात मोठी घसरण झाली असून, शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळत आहे. ही घसरण थांबवण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी लासलगाव बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर जगताप यांनी निवेदनाद्वारे केली आहे..सध्या लासलगाव बाजार समितीत दररोज ४० ते ५० हजार क्विंटल आवक होत आहे. नाशिक, सोलापूर, अहिल्यानगरसह शेजारील राज्यांतही उत्पादन ३० ते ४० टक्क्यांनी वाढल्याने दरावर दबाव आला आहे. सध्या सरासरी दर ११०० रुपये प्रति क्विंटल असून, उत्पादन खर्चाचा विचार करता ६०० ते ७०० रुपयांचा तोटा सोसावा लागत आहे..Onion Price Crash 2026: लाल कांद्याची आवक वाढल्याने दर दबावात.चालू वर्षी महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सोलापूर या जिल्ह्यांसह गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक व पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कांद्याचे उत्पादन झाल्याने देशांतर्गत कांद्याची मागणी कमी होत असून, दिवसेंदिवस कांदा बाजारभावात घसरण होत आहे. मागणीअभावी कांदा बाजारभावात घसरण सुरू असल्याने केंद्र शासनाच्या ध्येय धोरणांबाबत शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण होत असून, काही ठिकाणी कांदा लिलावाचे कामकाज बंद पाडून आंदोलन होत आहे, ही बाब निवेदनातून सरकारच्या निदर्शनास आणून दिली आहे..श्रीलंका व नेपाळमध्ये कांद्याची टंचाई असल्याने तिथे निर्यात सुलभ करण्याची विनंतीही जगताप यांनी केली आहे. हे निवेदन केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे व दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांना निवेदन देण्यात आले आहे..निवेदनातील प्रमुख मागण्याबांगलादेश सरकारने रोखलेले ‘एलसी’ (LC) पूर्ववत करून सीमा खुली करण्यासाठी केंद्र सरकारने चर्चा करावी.‘किंमत स्थिरीकरण निधी’अंतर्गत नाफेडमार्फत तत्काळ कांदा खरेदी सुरू करावी.फिलिपिन्स, जॉर्डन, युरोप, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये निर्यातीसाठी विशेष धोरण आखावे.निर्यात शुल्कातून जमा होणाऱ्या निधीचा ‘भावांतर फंड’ तयार करून बाजारभाव कमी असताना फरकाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी.रॅकमध्ये होणारा उशीर टाळण्यासाठी ‘किसान रेल’च्या धर्तीवर वेगवान रेल्वे सुविधा पुरवावी. तसेच ‘RoDTEP’ अंतर्गत निर्यात अनुदान वाढवून द्यावे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.