Onion Prices: सप्टेंबरमध्ये कांद्याच्या भावात जवळपास ५० टक्के घसरण झाली. फेब्रुवारी २०१९ नंतरची ही सर्वात मोठी घसरण आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले. या पार्श्वभूमीवर राजस्थानमधील शेतकऱ्यांनी या प्रकरणी तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी सरकारकडे केली आहे..सरकारच्या अंदाजानुसार, कांदा पीक उत्पादन खर्च प्रतिकिलो ८ ते १० रुपये आहे. पण शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की प्रत्यक्षात पीक उत्पादन खर्च प्रतिकिलो १८ ते २० रुपये आहे. तरीही, त्यांना खैरथल बाजार समितीत प्रतिकिलो ५ रुपये दराने कांदा विकावा लागत आहे. यामुळे त्यांचे मोठे आर्थिक सोसावे लागत आहे. एकूणच कांदा उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट बनली आहे. .Onion Crisis: पावसामुळे पीक येण्याची शक्यता नसल्याने कांद्यावर फिरवला रोटाव्हेटर.या प्रकरणी शेतकरी संघटना किसान महापंचायतने कांदा उत्पादकांना अशा आर्थिक अडचणीतून वाचवण्यासाठी 'बाजार हस्तक्षेप योजने'ची अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. जर सरकारने या समस्येकडे तत्काळ लक्ष दिले नाही तर राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे..Onion Auction: लासलगाव, पिंपळगाव बसवंतमध्ये कांद्याचे लिलाव सुरू.किसान महापंचायतीचे अध्यक्ष रामपाल जाट यांनी, आयात-निर्यात निर्णयांसह एकूणच सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली आहे. सरकारची खरेदी केंद्रे पुरेशी नाहीत. यामुळे शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी किमतीत शेतमाल विकावा लागत आहे..४ ट्रॉली कांदा नदीत फेकलादरम्यान, अलवर जिल्ह्यातील चंदपुरा गावातील शेतकऱ्यांनी मंगळवारी रात्री कष्टाने पिकवलेला सुमारे ३ ते ४ ट्रॉली कांदा कोरड्या नदीत फेकून दिला होता. कांद्याचा उत्पादनात खते, बियाणे, सिंचन, मजूर आणि वाहतुकीचा खर्च धरला तर उत्पादन खर्चही भरून निघत नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. येथील शेतकऱ्यांनी आधारभूत किमतीत कांदा खरेदी करण्याची मागणी केली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.