Onion Farmer Issue: कांद्याला ५० रुपये दर; शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
Onion Price Crisis: कांद्याला अवघा ५० रुपये प्रति क्विंटल दर मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी कांदा भरलेला ट्रॅक्टर थेट सटाणा बाजार समिती कार्यालयासमोर उभा करीत तीव्र आंदोलन छेडले. परिस्थिती इतकी चिघळली, की संबंधित शेतकऱ्याने भर बाजारात गळ्यात दोरखंड बांधून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली.