Onion Market News Updates : कांद्याचे भाव घसरल्याने महाराष्ट्रसह कर्नाटकातील उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत. विशेष म्हणजे भौगोलिक मानांकन प्राप्त 'बंगळूर रोज' (Bangalore Rose) कांदा उत्पादकांनाही याचा फटका बसला आहे. कर्नाटकच्या चिकबल्लापूरचे खासदार डॉ. के. सुधाकर यांनी या प्रकरणी केंद्र सरकारकडे तत्काळ हस्तक्षेपाची मागणी केली आहे. .भौगोलिक मानांकन (GI) प्राप्त ‘बंगळूर रोज’ कांदा उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना बाजारातील दर घसरणीमुळे मोठ्या संकटाचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांना एक पत्र पाठवले आहे. .कमी किमतीत शेतमालाची विक्री टाळण्यासाठी आणि किमतीत स्थिरता आणण्यासाठी त्यांनी बाजार हस्तक्षेप योजना लागू करण्याची मागणी केली आहे. 'बंगळूर रोज' हे कांद्याचे एक वैशिष्ट्यपूर्ण, आकाराने लहान, तिखट आणि गडद लाल रंगाचे वाण आहे. या वाणाचे पीक प्रामुख्याने कर्नाटकच्या चिक्कबल्लापूर, कोलार आणि बंगळूर ग्रामीण जिल्ह्यांत घेतले जाते. या कांद्याला परदेशातून मोठी मागणी आहे..Onion Price Drop: कांदा उत्पादकांसोबत बाजार समितीही तोट्यात.पश्चिम आशियातील भू-राजकीय तणावामुळे शेतमाल निर्यात ठप्प झाल्याने हे संकट निर्माण झाले आहे. यामुळे निर्यातक्षम बंगळूर रोज कांद्याची निर्यात साखळी बाधित झाली आहे. परिणामी, याचे भाव घसरले आहेत. यामुळे उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत असल्याचे डॉ. सुधाकर यांनी पत्रातून निदर्शनास आणून दिले आहे..Onion Storage Mistakes: कांदा साठवताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?.कांदा हे नाशवंत शेतपीक असून, तो विक्रीविना पडून असल्याचे परिस्थिती आणखीच बिकट झाली आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांना पाठवलेल्या एका वेगळ्या पत्रात त्यांनी निर्यातीसाठी पर्यायी बाजारपेठांचा पर्याय खुला करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. यावर दीर्घकालीन उपाय म्हणून 'पंतप्रधान किसान संपदा योजने'अंतर्गत कर्नाटकात प्रक्रियाविषयक पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा प्रस्ताव त्यांनी पुढे केला आहे. त्यात कांदा निर्जलीकरण आणि लोणचे उत्पादन केंद्रांचा समावेश आहे. यामुळे कच्च्या मालाच्या निर्यातीवरील अवलंबित्व कमी होईल आणि शेतकऱ्यांना मूल्यवर्धनाच्या संधी उपलब्ध होतील, असे त्यांनी नमूद केले आहे. .शेतकऱ्यांना कांदा रस्त्यावर फेकून देण्याची वेळचिकबल्लापूर येथील कांद्याची आग्नेय आशियाई देशांमध्ये निर्यात केली होते. पण, युद्धामुळे निर्यात ठप्प झाली आहे. परिणामी, कांद्याचा भाव गेल्या वर्षीच्या ८०० रुपयांच्या (५० किलो) तुलनेत घसरून केवळ २०० रुपयांपर्यंत खाली आला आहे. बाजारात भाव घसरल्याने काही शेतकऱ्यांनी नवीन कांद्याची काढणी केलेली नसून तो शेतात तसाच पडून आहे. तर काही शेतकऱ्यांनी त्याची काढणी करून तो रस्त्यांवर फेकून दिला आहे, असे येथील शेतकरी सांगतात. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.