Nasik Farmer Protest: यंदा पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. मात्र, अशा अडचणीच्या काळातही शेतकऱ्यांनी बैलपोळा उत्साहात साजरा केला. बैलांची पारंपरिक पद्धतीने सजावट करण्यात आली. यंदा मात्र या सजावटीतून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा सरकारच्या कांदा धोरणाविरोधातील संतापही व्यक्त झाला..देवळा तालुक्यातील मकरंदवाडी येथील शेतकरी भगवान जाधव यांनी आपल्या बैलाच्या सजावटीवर ‘नाफेड आणि एनसीसीएफ कायमचे बंद करा, एकाच पक्षाने कांद्यावर लक्ष द्या, कोरडा दुष्काळ जाहीर करा’ असा संदेश रेखाटून शासनाचे लक्ष कांदा उत्पादकांच्या प्रश्नांकडे वेधले..Onion Price Gap: कांदा खरेदी १२ ते १३ रुपयांत; ग्राहकांना ३५ रुपयांत विक्री.कांद्याच्या बाजारभावातील चढ-उतार, केंद्राच्या खरेदी-विक्री धोरणामुळे निर्माण होणारी अस्थिरता आणि कांदा उत्पादकांना अपेक्षित दर मिळत नसल्याच्या पार्श्वभूमीवर हा संदेश शेतकऱ्यांच्या मनातील नाराजी अधोरेखित करणारा ठरला..Onion Farmer Protest: कांदा उत्पादक करणार जंतर-मंतरवर आंदोलन.पोळ्याच्या सणात शेतकऱ्याच्या शेतीतील जिवाभावाचा साथीदार असलेल्या बैलाच्या सजावटीतूनच कांद्याच्या प्रश्नावर थेट भाष्य करण्यात आले.कांदा खरेदीमध्ये काम करणाऱ्या नाफेड आणि एनसीसीएफ या संस्थांच्या कारभाराबाबत शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे..ही नाराजी बैलपोळ्याच्या निमित्ताने व्यक्त झाली. कांदा उत्पादकांच्या प्रश्नांकडे सातत्याने लक्ष देण्याची, बाजारभावाला स्थैर्य देण्याची आणि दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी या संदेशातून करण्यात आली आहे. सणाच्या उत्साहातही कांद्याच्या प्रश्नाची धग कायम असल्याचे या संदेशातून दिसून आले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.