Impact of Export Ban and Price Drop on Onion Growers: कांद्याला बाजारात अवघा एक रुपया प्रति किलो इतका नीचांकी दर मिळत असून कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. गेल्या चार महिन्यांत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्री झालेल्या कांद्यामध्ये शेतकऱ्यांच्या खिशातील जवळपास ४०० कोटी रुपये बुडाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. केंद्र सरकारच्या निर्यातबंदी व ग्राहकधार्जिण्या धोरणाचा हा मोठा फटका असल्याची भावना शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे..शुक्रवारी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला किमान अवघे १०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. चालू वर्षातील हा नीचांकी दर मानला जात असून उत्पादक शेतकरी अक्षरशः देशोधडीला लागला आहे..Onion Farmer Crisis: व्यापाऱ्यांच्या मनमानीमुळे कांदा उत्पादकांची बाजारकोंडी .खरीप कांद्याला हंगामाच्या सुरुवातीला काही प्रमाणात समाधानकारक दर मिळाले होते; मात्र अतिवृष्टीमुळे उत्पादन घटल्याने त्याचाही फारसा फायदा शेतकऱ्यांना झाला नाही.रब्बी हंगामात मात्र परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. नोव्हेंबरपासून कांद्याचे दर सातत्याने उत्पादन खर्चापेक्षा कमी राहिले आहेत. गेल्या चार महिन्यांची आकडेवारी पाहता सोलापूर बाजार समिती परिसरात विक्री झालेल्या कांद्यामध्ये शेतकऱ्यांच्या भांडवली गुंतवणुकीतील तब्बल ३९५ कोटी रुपये बुडाल्याचे दिसून येत आहे..यात शेतकऱ्यांच्या श्रममूल्याचाही समावेश नसल्याचे सांगितले जात आहे.दरम्यान, वाढलेले बियाण्यांचे दर, मजुरी, रासायनिक खतांचे गगनाला भिडलेले भाव, औषध फवारणीचा खर्च आणि बदलते हवामान यामुळे कांद्याचा उत्पादन खर्च प्रतिकिलो १८ रुपयांपर्यंत पोहोचला आहे..Onion Farmer Crisis: भरपाई सोडाच साधी चौकशीही नाही; ५० पैसे ते दोन रुपये दरामुळे कांदा उत्पादकाचा संताप.मात्र बाजारात सरासरी अवघा ६ रुपये प्रति किलो दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना प्रतिकिलो १० ते १२ रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. दरकपातीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून अनुदानाची अपेक्षा होती. मात्र याबाबत कोणतीही ठोस घोषणा न झाल्याने उत्पादकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे..गेल्या चार महिन्यांतील कांद्याची आवक अन् सरासरी दर प्रतिक्विंटलजानेवारी - १२ लाख ५० हजार १४९ क्विंटल सरासरी दर : ८५० रु.फेब्रुवारी - ९ लाख ७२ हजार १५७ क्विंटल सरासरी दर : ८०० रु.मार्च - ८ लाख ८४ हजार ५१३ क्विंटल सरासरी दर : ६५० रु.एप्रिल - ५ लाख ६९ हजार २९ क्विंटल सरासरी दर : ६०० रु..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.