Chhatrapati Sambhajinagar: कमी भाव, वाढता खर्च आणि खराब होणारा माल, त्यास फुटणारे अंकुर यामुळे सध्या उत्पादन खचपिक्षा नीचांकी बाजारभाव मिळत असल्याने कांदा उत्पादक कमालीचे हतबल झाले आहेत..माहितीनुसार, दोन-तीन वर्षांपासून कांद्याचे भाव चांगले असल्याने या वर्षी मोठ्या प्रमाणावर गोदावरी नदी काठच्या कायगाव, जामगाव, अमळनेर, लखमापूर, भिवधानोरा, गळनिंब, गणेशवाडी, अगरवाडगाव, धनगरपट्टी, ममदापूर, बगडी, नेवरगाव, अगरकानडगाव आदीं गाव शिवारात शेकडो हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी कांद्याची लागवड झाली..Onion Rate Crisis : केंद्राच्या धोरणाचा निषेध करत ढोल वाजवून कांद्याचे मोफत वाटप.मात्र, प्रतिकूल हवामानामुळे अपेक्षित उत्पादन मिळाले नाही. चांगल्या प्रतीचा कांदा असलेल्या शेतकऱ्यांनी तो साठवून ठेवला. जुलै-ऑगस्टनंतर मागणी वाढून दर दोन ते पाच हजार रुपयांपर्यंत वाढण्याचा अनुभव असल्याने शेतकऱ्यांनी हा निर्णय घेतला होता..मात्र, या वर्षी चित्र उलटे झाले असून, दर वाढण्याऐवजी घसरत आहेत.आता कांद्याला दोन रुपये ते तेरा रुपयेपर्यंत असा कवडीमोल भाव मिळत आहे. अनेकांचा कांदा चाळीतच सडू लागल्याने तो उकिरड्यावर फेकावा लागत आहे..Onion Crisis: कधी मिटणार कांद्याचा वांदा? .कांदा लागवड पासून चाळीत साठवून ठेवण्यात पर्यंत ७० हजार रुपये प्रति एकरी खर्च येतो. या वर्षी हमी भावाचा अभाव, उष्णतेची लाट आणि चाळीत ठेवल्यानंतर पावसाळ्यातील आद्रर्ता, बुरशी, काजळीमुळे कांदा भाव वाढीच्या प्रतीक्षेत सडतो आहे..त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या सर्व बाबी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अडचणीच्या ठरल्याने त्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. कांदा टिकावा म्हणून सर्व खबरदारी घेतली..Onion Rate Crisis : कशी फुटेल कांदादर कोंडी?.चाळीतील ७० टक्के कांदा उकिरड्यावरअमळनेर येथील संदीप रावसाहेब सावंत हे पाच वर्षापासून कांदा पीक घेतात. या वर्षी सहा एकर कांदा लागवड करून चांगले पीक घेतले. त्यांना 600 क्विंटल उत्पादन मिळाले.तीन लाख साठ हजार रुपयांचा खर्च आला. त्यापैकी १०० क्विंटल कांदे उकिरड्यावर गेले. उरलेला ५०० क्विंटल कांद्यापैकी २५० क्विंटल कांदा खराब (बदला) निघाला, चांगला २५० कांदा बाजारात नेत आहे, .पण त्याला ही भाव नाही. ८० हजार रुपयांनी तोट्यात आले. पाच महिने उलटून ही दर न वाढल्याने त्यांनी कांदा विक्रीसाठी कांदा चाळ उघडली.मात्र त्यातील ७० टक्के पेक्षा जास्त कांदा सडलेला आढळला आहे. खर्च देखील निघाला नाही..कांद्याचे दर सप्टेंबरमध्ये वाढतील या आशेवर वाट पाहत होतो.मात्र दर वाढले नाही, घसरण झाली. बियाण्यांचे भरमसाठ भाव वाढतात,तर कांद्याचे देखील भाव वाढवा.अशी मागणी सरकारला करतो.- संदीप सावंत, कांदा उत्पादक शेतकरी, अमळनेर, ता. गंगापूर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.