Kalvan News: शेतकऱ्यांनी चाळीत साठवणूक केलेल्या उन्हाळ कांद्याला चार महिने झाले असून, साठविलेल्या कांद्याची टिकवण क्षमता यंदाच्या दमट वातावरणामुळे संपत आली आहे. त्यामुळे भाववाढीच्या आशेवर बसलेल्या शेतकऱ्यांना निर्यात सुरू होऊनही दरवाढ न मिळाल्याने व मोठ्या प्रमाणात कांदा सडू लागल्याने निराशा पदरी पडली आहे. .उन्हाळ कांद्याची बांगलादेशात निर्यात सुरू होईल, नाफेडची खरेदी सुरू होईल व कांदा बाजारभावात तेजी येईल या आशेवर बसलेल्या कांदा उत्पादक, शेतकऱ्यांच्या पदरी बांगलादेशला निर्यात सुरू झाल्यानंतरही निराशा कायमच आहे..Onion Seed Crop Loss: पाचशे हेक्टर कांदा बीजोत्पादनाला फटका.यंदा चाळीतील कांदा मोठ्या प्रमाणात लवकरच खराब होऊ लागलेल्या मिळेल त्या भावात शेतकरी कांदा विक्री करीत आहेत. मागील वर्षी परिसरात पावसाळा चांगला असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उन्हाळ कांद्याची लागवड केली..Crop Loss: अवेळी पाऊस अन् रोगराईचा फटका.कांदा लागवडीसाठी उन्हाळी कांद्याचे बियाणे, दुबार टाकूनही उपयोग होत नसताना तिसऱ्यावेळेस देखील काही शेतकऱ्यांनी रोपे टाकली. त्यात लागवडीचा खर्च, खते, फवारणी, काढणी, साठवणुकीचा खर्च पाहता शेतकऱ्यांनी यावर्षी प्रचंड भागभांडवल खर्च केले होते..शेतात चालविला रोटरऐन कांदा काढणी दरम्यान पावसात कांदा भिजला व काही शेतकऱ्यांनी काढलेला कांदा सडू लागल्याने फेकून दिला. तर काही शेतकऱ्यांचा कांदा महिनाभर शेतात भिजल्याने शेतात रोटर चालविला. .Weight Loss Yoga : जलद वजन कमी करण्यासाठी 'ही' योगासने दररोज कराच!.ज्या शेतकऱ्यांनी कांदा सुरक्षित काढून चाळीत साठवला त्यात मे व जून महिन्यात्तच पाऊस झाल्याने चाळीतला कांदा दमट वातावरणाने खराब झाला. आज शेतकऱ्यांकडे अत्यंत कमी प्रमाणात कांदा शिल्लक असताना व बांगलादेशात निर्यात सुरू झाली असली तरी,कांदा भावात पाहिजे असलेल्या प्रमाणात तेजी आलेली नसल्याने शेतकरी संकटांत आहे..यंदा उन्हाळ कांद्याची निर्यात आज ना उद्या सुरू होईल, कांदा बाजारभावात तेजी निर्माण होईल व पदरात दोन पैसे पडतील या आशेवर थांबलेल्या शेतकऱ्यांचा आजच्या घडीला हिरमोड झाला आहे. - काशीनाथ गुंजाळ, कांदा उत्पादक शेतकरी, विसापूर.लोकसभा निवडणुकीत कांदा उत्पादक पट्ट्यातील शेतकऱ्यांनी सत्ताधारी पक्षाला नाकारल्यावर कांदा उत्पादकांना आश्वासन दिले. मात्र, आता सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याने कांदा पीक सडू लागले आहे. तसेच वजनात घट झाली आहे.- शीतलकुमार आहिरे, जुनी बेज कांदा उत्पादक शेतकरी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.