Onion Export : नेपाळमध्ये सुरु असलेल्या संघर्षामुळे सीमा बंद केल्या आहेत. यामुळे भारतातून नेपाळमध्ये होणारी कांद्याची निर्यात थांबली आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. दरम्यान, ट्रकमध्ये भरलेला कांदा व्यापारी स्थानिक बाजारात विक्री करु लागले आहेत. यामुळे दर घसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे..बिहारमधील अहियापूर कृषी उत्पादन बाजार समितीमधील व्यापारी संघाचे अध्यक्ष विजय चौधरी यांनी म्हटले आहे की, बिहारमधून दररोज विविध सीमामार्गाने नेपाळमध्ये ५० हून अधिक ट्रक कांदा पाठवला जातो. पण सीमा बंद केल्याने कांदा पडून आहे. तीन दिवसांपासून व्यापारी सीमा भागाला लागून असलेल्या सीतामढी, मधुबनी, जयनगर, किशनगंज आदी ठिकाणी असलेल्या बाजारांत ट्रकमध्ये भरलेल्या कांद्याची विक्री करत आहेत..Onion Prices : कांद्याचे भाव पडल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू; आंध्र प्रदेश सरकारने घेतला मोठा निर्णय.परिणामी, कांद्याचे भाव खाली आले आहेत. याआधी कांद्याचा भाव प्रति क्विंटल १६०० रुपये होता. आता त्याची प्रति क्विंटल १४०० ते १५०० रुपये दराने विक्री केली जात आहे. एका व्यापाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, यावेळी महाराष्ट्रातील नाशिक आणि मध्य प्रदेशात कांद्याचे पीक चांगले झाले आहे. यामुळे कांद्याची आवक चांगली आहे. दरम्यान, बिहारमधून नेपाळला कमी प्रमाणात बटाट्याची निर्यात केली जाते. सध्या बटाट्याच्या दरावर कोणताही परिणाम दिसून आलेला नाही..कांदा, सोयापेंड निर्यातीत घटनेपाळमधील हिंसाचारामुळे मध्य प्रदेशातून होणाऱ्या कांदा आणि सोया पेंडच्या निर्यातीत घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सीमा बंद झाल्याने निर्यात ठप्प झाली आहे. परिणामी स्थानिक बाजारात शेतमालाच्या दरात मोठी घसरण झाली आहे..Onion Rate: चार महिन्यांनंतरही कांद्याचे दर ‘जैसे थे’.अधिक मिळालेल्या माहितीनुसार, साधारणपणे, मध्य प्रदेशातून दररोज ३० ते ३५ ट्रक विविध उत्पादने मुख्यतः कांदा आणि सोयापेंड नेपाळमध्ये पाठवली जाते. रक्सौल, विराटनगर आणि सुनौली या ठिकाणी असलेल्या प्रमुख सीमामार्गे ही निर्यात केली जाते..निर्यातीचा कांदा स्थानिक बाजारात वळवलाइंदूरमधून आठवड्यातून दोन ते तीन ट्रक कांद्याची निर्यात केली जाते. पण नेपाळमधील हिंसाचारामुळे व्यापार पूर्णपणे ठप्प झाला आहे. हा कांदा आता भारतीय बाजारात विक्रीसाठी वळवावा लागत असल्याने कांद्याच्या भावात घसरण झाली असल्याचे येथील निर्यातदारांचे म्हणणे आहे..यामुळे कांद्याचे भाव प्रति किलो ७ ते १२ रुपयांपर्य़ंत खाली आले आहेत. गेल्या पाच महिन्यांत कांद्याचे भाव ३० टक्क्यांनी घसरले आहेत. कांदा निर्यातीबाबतच्या अधिकृत आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये मध्य प्रदेशातून नेपाळमध्ये एकूण १,२९९ कोटी रुपयांची निर्यात झाली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.