Nashik News: यंदा उन्हाळ कांद्याचे भाव वाढले नसले, तरीही नवी आशा-नवी उमेद मनी बाळगून ‘कसमादे’ भागात कांदालागवड जोमात सुरू आहे. शेतशिवारात सगळीकडे उळे, मजूर, खते, पाणी देणे याचीच धावपळ दिसून येते. परतीच्या पावसामुळे यंदा सगळीकडे मुबलक पाणी आहे. मात्र, मजूर उपलब्ध होत नसल्याने चहा, फराळ देत मजुरांची सरबराई केली जाते. काही भागांत ट्रॅक्टरच्या मशिनने कांदा लागवड सुरू आहे. .डाळींब पिकांवर रोगांच्या आक्रमणामुळे या फळपिकाची झालेली वाताहात, कारखानदारीला लागलेल्या ग्रहणामुळे उसाकडे फिरवलेली पाठ आणि भाजीपाल्याला मिळत असलेले अत्यल्प भाव यामुळे कसमादेतील शेतकऱ्यांनी ऊस, डाळिंब, भाजीपाला पिकांकडे पाठ फिरवत ''कांदा एके कांदा'' चा कित्ता गिरवणे सुरू केल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात कांदा लागवड करीत आहेत..Onion Cultivation: उन्हाळी कांद्यासाठी कोणती सुधारित लागवड पद्धत वापरावी?.पुन्हा कांद्याचे जुगारकसमादे पट्ट्यातच जवळपास ५०-६० हजार हेक्टरपेक्षा जास्त कांदा लागवडीचा अंदाज आहे. कसमादेत बहुतांश भागात डाळिंब व ऊस ही नगदी पिके शेतकरी हमखास घेत. परंतु तेल्या, मर, प्लेग अशा रोगांमुळे डाळिंबाचा गोडवा कमी झाला आहे. डाळिंबासारखीच परिस्थिती ऊस या पिकाची झाली आहे. बंद पडत चाललेले कारखाणे, विभाजनामुळे जमिनीचे कमी कमी होत चाललेले क्षेत्र यामुळे उसाची लागवड फारसे कुणी करतांना दिसत नाही. अशा स्थितीत पुन्हा कांद्याचा जुगारासाठी कसमादेतील शेतकरी सरसावले आहेत..Onion Cultivation: कांदा लागवडीची तयारी; रोपवाटिका तयार. कांद्याची लागवड इतक्या मोठ्या प्रमाणात आहे कि, मजूर मिळणे दुरापास्त झाले आहे. गेले आठ -दहा दिवस आदिवासी बांधवांचा डोंगऱ्यादेव उत्सव असल्याने मजुरांची मोठ्या प्रमाणात टंचाई भासत होती. आता मजूर उपलब्ध होत असले तरी मक्ता पद्धतीवर भर असल्याने आणि दिवसा वीजपुरवठा नसल्याने सकाळी लवकर तर रात्री उशिरापर्यंत कांदालागवड केली जात आहे..जमिनीचे विभाजन झाल्याने ऊस हे वार्षिक पीक परवडत नाही. शेतकरी उसाचे पीक न घेता कांदा व इतर नगदी पिकांकडे वळला आहे. मात्र, कांद्यालाही यंदा अल्प भाव मिळाल्याने शेतकरी कोमात गेला असला, तरी नवी आशा व नवी उमेद बाळगत ते जोमात कांदा लागवड करीत आहे. शासनाने कांद्याची निर्यात वाढवत शेतकऱ्यांना कांद्याचे दोन पैसे मिळतील, यासाठी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे."- कुबेर जाधव, शेती अभ्यासक, विठेवाडी (ता. देवळा).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.