Jalgaon News: खानदेशात कांदा रोपवाटिकांना मागील महिन्याच्या अखेरीस झालेल्या पावसाचा फटका बसला आहे. यातच कांदा लागवडही रखडली आहे. अनेक दिवसांपासून ऊन, निरभ्र वातावरण नाही. पावसाळी, ढगाळ वातावरण असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. .यंदा लागवड स्थिर आहे. पण काहींनी रोपवाटिका उशिरा तयार केल्या. त्यातील रोपांची पुनर्लागवड मागील महिन्याच्या अखेरीस पूर्ण होणे अपेक्षित होते. पण लागवड पावसाने रखडली आहे. कारण पावसाने वाफसा नाही. रोपवाटिकांतून रोपे व्यवस्थित काढून त्यांची पुनर्लागवड करणे नुकसानकारक किंवा त्रासदायक आहे..Onion Cultivation: कांदा लागवडीसाठी ‘यांत्रिकीकरणा’चा आधार .कांदा लागवड यंदा खानदेशात उशिरापर्यंत सुरू आहे. अनेकदा लागवड २५ जानेवारीपूर्वीच पूर्ण होते. पण यंदा लागवड जानेवारीच्या अखेरीसही सुरू होती. त्यात पाऊस आला. यंदा लागवड वाढेल, असा अंदाज होता. पण लागवड स्थिर आहे. जळगावात सुमारे १४ हजार हेक्टर तर धुळ्यात २० हजार हेक्टरवर कांदा पीक आहे. नंदुरबारातही सुमारे साडेचार हजार हेक्टरवर कांदा लागवड झाली आहे. धुळ्यातील शिरपुरात लागवड रखडली आहे. अन्य भागातील लागवड पूर्ण होत आली आहे..Onion Cultivation: देवणीत कांदा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल.रखडलेली लागवड पूर्ण होण्यासाठी किमान एक ते दोन दिवस निरभ्र वातावरण हवे आहे. मध्यम, हलक्या जमिनीत वाफसा तयार होतो. तसेच मजूरही लागवडीसाठी तयार होतात. पण काळ्या कसदार जमिनीत कांदा लागवडीसाठी मजूर नकार देतात. यामुळे कांदा लागवडीसंबंधी खानदेशात यंदा उशीरदेखील होत आहे. पुढे मे अखेरीस या पिकातून काढणी सुरू होईल..अनेकांची नोव्हेंबरमध्येच तयारीकांदा रोपवाटिका निर्मितीसाठी कांदा बियाण्याची खरेदी शेतकरी नोव्हेंबरपासून करीत होते. लागवड नोव्हेंबर अखेरीस सुरू झाली. लाल कांद्याची अधिक लागवड झाली आहे. यंदा सुमारे ४० ते ४२ हजार हेक्टरवर खानदेशात कांदा लागवडीचा अंदाज होता. पण लागवड खानदेशात सुमारे ३८ हजार हेक्टरवर झाली आहे. नंदुरबारातील लागवडी स्थिर आहे. कांद्याचे दर अस्थिर आहेत. रोपवाटिका निर्मिती काही जण व्यावसायिक स्वरूपात करीत होते..तर काही शेतकरी बियाणे खरेदी करून आपल्या लागवडीच्या नियोजनासंबंधी कांदा रोपवाटिका तयार करीत होते. कांदा रोपांची मागणी यंदा कमी होती. व्यावसायिक रोपवाटिका चोपड्यातील अडावद, धानोरा, माचले, लासूर, मराठे आदी गावांसह यावलमधील साकळी, किनगाव, शिरसाड, चुंचाळे, आडगाव, डांभुर्णी, धरणगावमधील पथराड, चोरगाव, भुलपाटे, टहाकळी, दोनगाव, एरंडोलमधील खर्ची, रवंजे, धुळ्यातील साक्री, शिंदखेडा, धुळे आदी भागात होत्या. अनेकांनी नाशिकमधील सटाणा, मालेगाव, चांदवड भागातूनही कांदा रोपे आणली. सुमारे ४०० हेक्टरवर या कांदा रोपवाटिका खानदेशात होत्या. उष्णता व प्रतिकूल स्थिती लक्षात घेता अनेक शेतकरी ठिबकवर लागवड करीत होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.