Onion Cultivation: गिरणा परिसरात वाढली कांदा लागवड
Summer Onion: गिरणा व मन्याड धरण यंदा शंभर टक्के भरल्याने पाण्याची मुबलक उपलब्धता आहे. त्यामुळे तालुक्यात उन्हाळी कांदा साधारणतः साडेतीन हजार हेक्टरवर लागवड होण्याची शक्यता असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. मागील वर्षी २ हजार ९०२ हेक्टरवर कांदा लागवड झाली होती.