Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा कांदा लागवडीचे क्षेत्र सरासरी एवढे झाले आहे. यंदा आतापर्यत २० हजार ६३५ हेक्टरवर कांदा लागवड झाली आहे. मध्यंतरीच्या पावसाच्या खंड, सातत्याने पडत असलेल्या दराचा परिणाम काहीसा लागवडीवर झाल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा आठ हजार हेक्टरने लागवड क्षेत्र कमी झाले आहे..अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून कांदा लागवडीचे क्षेत्र वाढत आहे. दरवर्षी खरीप, लेट खरीप, रब्बी आणि उन्हाळी मिळून आडीच लाख हेक्टरपर्यंत कांद्याची लागवड होत असते. गेल्या वर्षी तर सुमारे पावने तीन लाख हेक्टरपर्यंत कांदा लागवड झाली होती. .Kharif Onion Cultivation: खरीप कांदा लागवड क्षेत्रात ५० टक्क्यांनी घट.खरिपात लाल (नाशिक) कांद्याची लागवड होत असते. यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला. मात्र नंतर मध्यंतरीच्या काळात पावसाचा खंड पडला होता. याशिवाय यंदा उन्हाळ्यात कांद्याचे नुकसान झाले,दरही सातत्याने पडले असल्याचा परिणाम यंदा कांदा लागवडीवर झाल्याचे दिसत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात कांद्याचे सरासरी २० हजार २६८ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. आतापर्यंत २० हजार ५३५ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे..Onion Cultivation : खानदेशात कांदा पिकात खते देण्यास वेग.यंदा कर्जत, पाथर्डी, अहिल्यानगर जिल्ह्यात लागवड बऱ्यापैकी झाली आहे. श्रीरामपूर, राहुरी, अकोले आणि राहाता तालुक्यात अल्प कांदा लागवड झाली आहे. पाथर्डी, कर्जत, अहिल्यानगर, संगमनेर, नेवासा तालुक्यात खरिपात सरासरीपेक्षा अधिक कांदा लागवड झाली असून पारनेर तालुक्यात यंदा क्षेत्र घटल्याचे पहायला मिळत आहे. .गेल्या वर्षी खरिपात ३६ हजार हेक्टरवर कांदा लागवड झाली होती. यंदा खरिपात जरी कांद्याचे क्षेत्र कमी झालेले असले तरी आता रब्बी कांद्याची लागवड सुरू होत आहे. यंदा पाणी उपलब्धतेची स्थिती चांगली असल्याने रब्बीत लागवड अधिक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे..तालुकानिहाय कांदा लागवड कंसात सरासरी क्षेत्र (हेक्टर)अहिल्यानगर ः ३८९५ (३३३३), पारनेर ः १९०७ (३६९३), पाथर्डी ः ३९४४ (२४५८), कर्जत ः ३३८० (३१७९), जामखेड ः १२२५ (९३९), श्रीरामपुर ः २ (५६.४८), श्रीगोंदा ः १९७७ (२३५०), राहुरी ः ७ (१०१५), नेवासा ः ४११ (१०९.५७), शेवगाव ः ३२८ (६५६), संगमनेर ः ३२२१ (२३४०), कोपरगाव ः १९४ (५.४१), अकोले ः ०.५ (५.४१), राहाता ः १४४ (१२४) .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.