Onion Arrival in Solapur Market: सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. १६) दीड वर्षांतील सर्वात कमी कांद्याची आवक नोंदविण्यात आली. अवघ्या ९७ गाड्या कांदा विक्रीसाठी आल्या होत्या. आवक घटल्याने भावात ५० रुपयांची किंचित वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल सरासरी १२५० तर उच्चांकी दर २८०० रुपयांपर्यंत मिळाला. .सोलापूर बाजार समितीत सोलापूरसह बीड, अहिल्यानगर, पुणे, नाशिक, कोल्हापूर येथून कांदा विक्रीसाठी येतो. पुण्यातील दौंड, बारामती, शिरूर, अहिल्यानगरमधील कर्जत, जामखेड आणि बीड जिल्ह्यातील धारूर, वडवणे येथून कांदा सोलापुरात विक्रीसाठी येतो..Low Onion Procurement: कांदा खरेदी अर्धा टक्क्यापेक्षाही कमी; सरकारची यंत्रणा अपयशी, शेतकऱ्यांनी फिरवली पाठ.सध्या करमाळा, माढा, मोहोळ, माळशिरस तालुक्यांतून काही कांदा विक्रीसाठी येत आहे. मंगळवारी ९७ ट्रकमधील नऊ हजार ७६८ क्विंटल कांद्याच्या विक्रीतून एक कोटी २२ लाख १० हजार रुपयांची उलाढाल झाली..NAFED-NCCF Onion Procurement: कांदा खरेदीचा सावळागोंधळ!.नोव्हेंबर २०२५ ते १६ जून २०२६ या कालावधीत कांद्याला सरासरी १२०० रुपये तर उच्चांकी २१०० ते २२०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. आता आवक कमी झाली असून भावात काहीशी सुधारणा होत असल्याचे दिसून येत आहे..मंगळवारचा बाजार समितीतील कांदा बाजारएकूण आवक ः ९७ मालगाड्या (९७६८ क्विंटल)कमाल दर ः २८०० रुपये प्रतिक्विंटलसरासरी दर ः १२५० रुपये प्रतिक्विंटल.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.